Beed Crime | बीड जिल्ह्यात गुरुवारी (२५ सप्टेंबर) रात्री घडलेल्या एका खळबळजनक घटनेने शहर हादरले आहे. स्थानिक वर्तमानपत्रातील पत्रकार देवेंद्र ढाका (journalist son murdered) यांचा मुलगा यश देवेंद्र ढाका (Yash devendra Dhaka) (वय २२) याचा त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने खून केला. साधारण महिनाभरापूर्वी वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या वादातून या दोघांमध्ये वैर निर्माण झाले होते. अखेर त्याच वैरातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वर्दळीच्या ठिकाणी घडली घटना :
गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास माने कॉम्प्लेक्स परिसरात ही घटना घडली. यश व त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात वाद झाला. वाद चिघळताच सूरजने जवळ ठेवलेला चाकू काढून थेट यशच्या छातीत वार केला. दोन वार आरपार गेल्याने यश रक्तबंबाळ झाला. तातडीने त्याला मित्रांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Yash devendra Dhaka Murder)
माहितीनुसार, साधारण महिनाभरापूर्वी वाढदिवस साजरा करताना यश व सूरज यांच्यात भांडण झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये खुन्नस निर्माण झाली होती. गुरुवारी रात्री पुन्हा वाद झाल्यानंतर सूरजने चाकू हाती घेत थेट हल्ला केला. घटनेनंतर सूरज फरार झाला, मात्र पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली आहे.
Beed Crime | बीड शहरात खळबळ :
पत्रकाराच्या मुलाचा खून झाल्याने बीड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अत्यंत वर्दळीच्या भागात घडलेल्या या हत्येमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Yash devendra Dhaka Murder)
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे इतर कोणी या हत्येत सामील होते का, याचा शोध घेतला जात आहे.






