“सरकार आता ‘माझा लाडका घोडा’ योजना आणतंय, मग कुत्रे..”; जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं

On: August 3, 2024 11:45 AM
Jitendra Awhad Criticized Government on New Scheme
---Advertisement---

Jitendra Awhad | राज्यभरात सध्या ‘लाडकी बहीण योजना’ आणि ‘लाडका भाऊ योजना’ची चर्चा आहे. महिलांची योजनेसाठी अर्ज करायला झुंबड उडाली आहे. मात्र, लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी हा प्रयोग होत असल्याचा हल्लाबोल महायुती सरकारवर विरोधी गट करत आहेत. अशात मुंबई पोलीस विभागात अश्वदल सुरु होणार असल्याचे एका बातमीचा आधार घेत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर (Jitendra Awhad) जोरदार टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी नव्या एका योजनेचे नाव घेत सरकारला डिवचले आहे. त्यामुळे त्यांचं ट्वीट आता चर्चेत आलंय. निर्णय घेता येतो, म्हणून असा निर्णय घ्यायचा?, असा खोचक सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट काय?

आज बातमी आलेय की, मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार! पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते.आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून समजले. आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी ‘खेचरं’ येतील. जिथे माणसांना चालायला जागा नाही; तिथे घोडे कुठे नेणार आहेत?

निर्णय घेता येतो, म्हणून असा निर्णय घ्यायचा? ही नवीन योजना आहे, “माझा लाडका घोडा” आणि हो, हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील; तेव्हा त्यांच्या मागे कुत्रे लागतील ते वेगळेच! असं ट्वीट जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. हे ट्वीट आता चर्चेत आलंय.

अश्वदलाचा निर्णय नेमका काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आता विविध ठिकाणी घोड्यावरुन गस्त घालणार आहेत. त्याला माऊंटेड पोलीस युनिट असे नाव देण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारने 36 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आहे. या निधीतून पोलिसांसाठी 30 उमदे घोडे खरेदी करता येतील.

इतकेच(Jitendra Awhad) नाही तर, या अश्वांसाठी सर्व सुविधांनी युक्त खास तबेला देखील तयार केला जाणार आहे. तसेच पोलिसांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात येईल. पोलिसांना घोड्यांचा आहार तसेच इतर सगळी माहिती देण्यात येईल. देशात गुजरात, कोलकाता, कर्नाटक, हैदराबाद, चेन्नई येथील पोलिसांकडे असे अश्व दल आहेत.

News Title –  Jitendra Awhad Criticized Government on New Scheme

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वसामान्यांना दिलासा! टोमॅटोचे दर अर्ध्यावर, पण इतर भाज्या कडाडल्या

आज शनिदेव ‘या’ राशींवर असणार मेहेरबान; मोठा धनलाभ होणार

लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात अदिती तटकरेंचं रायगड आघाडीवर!

अखेर ऐश्वर्या रायने दिली कबूली म्हणाली, “सर्व काही….”

OTT वरील ‘हे’ 3 चित्रपट एकटे पाहण्याचं धाडस करू नका; खूप जास्त..

Join WhatsApp Group

Join Now