Bollywood News | बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा, अभिनेत्री रेखा (Rekha) हिचे आयुष्य जितके तिच्या अभिनयाने आणि चित्रपटांनी गाजले, तितकेच ते तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळेही चर्चेत राहिले. तिची अनेक प्रेमप्रकरणे आणि अयशस्वी लग्न हा नेहमीच कुजबुजीचा विषय ठरला. यापैकीच एक नाते अभिनेते जितेंद्र (Jeetendra) यांच्यासोबतचे होते, ज्याचा शेवट अत्यंत दुःखद झाला.
एका वक्तव्याने मोडलं नातं
रेखा (Rekha) आणि जितेंद्र (Jeetendra) ही त्यांच्या काळातील एक यशस्वी ऑन-स्क्रीन जोडी होती. त्यांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आणि याच काळात त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असली तरी, पडद्यामागे जितेंद्र यांच्या मनात रेखाबद्दल वेगळ्याच भावना होत्या, ज्याची तिला कल्पनाही नव्हती.
‘बेचारा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या एका घटनेने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. असे म्हटले जाते की, सेटवर जितेंद्र यांनी एका कनिष्ठ कलाकाराजवळ रेखा ही त्यांच्यासाठी केवळ ‘टाइम पास’ असल्याचे वक्तव्य केले. जेव्हा ही गोष्ट रेखाच्या कानावर पडली, तेव्हा तिला मोठा मानसिक धक्का बसला. जितेंद्र यांचे हे शब्द तिच्या जिव्हारी लागले आणि या घटनेनंतर ती ढसाढसा रडली होती, ज्यामुळे त्यांचे नाते कायमचे संपुष्टात आले.
Bollywood News | चर्चेत राहिलेलं प्रेमप्रकरण
जितेंद्र यांच्याव्यतिरिक्त रेखाचे नाव अनेक दिग्गज कलाकारांशी जोडले गेले. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि विनोद मेहरा (Vinod Mehra) यांच्यासोबतच्या तिच्या नात्याची सर्वाधिक चर्चा झाली. इतकेच नव्हे, तर सुनील दत्त (Sunil Dutt), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांसारख्या कलाकारांसोबतही तिचे नाव जोडले गेले, परंतु यातील कोणतेही नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.
अखेरीस, १९९० साली रेखा यांनी मुंबईतील (Mumbai) एका मंदिरात व्यावसायिक मुकेश अग्रवाल (Mukesh Aggarwal) यांच्याशी विवाहगाठ बांधली. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच मुकेश यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर रेखा यांनी पुन्हा लग्न केले नाही आणि आज वयाच्या ७१ व्या वर्षीही त्या एकाकी जीवन जगत आहेत.






