गटबाजी टाळण्यासाठी अजित पवारांचे ‘धक्कातंत्र’?; बारामतीत मोठी खेळी

On: November 4, 2025 3:04 PM
Ajit Pawar (1)
---Advertisement---

Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात मोठी बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) राजकारणात सक्रिय प्रवेश करणार असल्याची चिन्हे आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते बारामती (Baramati) नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार असू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

गटबाजी टाळण्यासाठी अजित पवारांचे ‘धक्कातंत्र’?

अजित पवार (Ajit Pawar) यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मावळ (Maval) लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासूनच जय पवार (Jay Pawar) यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा होती. जय (Jay) हे बारामतीच्या (Baramati) स्थानिक राजकारणात सक्रिय असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीत वडिलांच्या प्रचारातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

यंदा बारामती (Baramati) नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, राष्ट्रवादी (NCP) पक्षातच अनेकजण इच्छुक आहेत. यामुळे पक्षात गटबाजी आणि संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. हा अंतर्गत वाद टाळण्यासाठीच अजित पवार (Ajit Pawar) थेट जय (Jay) यांना उमेदवारी देऊन ‘धक्कातंत्र’ वापरू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

Ajit Pawar | कोण आहेत जय पवार?

जय पवार (Jay Pawar) हे अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांचा कल राजकारणापेक्षा उद्योग-व्यवसायाकडे जास्त राहिला आहे. त्यांनी काही काळ दुबईत (Dubai) व्यवसाय केल्यानंतर आता ते मुंबई (Mumbai) आणि बारामती (Baramati) येथील आपले व्यवसाय सांभाळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यापासून जय (Jay) यांनी स्थानिक राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आई सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्यसभेवर गेल्यानंतर, बारामतीतील (Baramati) जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जय पवार (Jay Pawar) यांनी पुढाकार घेतला असून, त्यांचा राजकीय वावर वाढला आहे.

News title : Jay Pawar: Baramati Politics Entry?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now