Jawalega mesai sarpanch Attack l धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला :
नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच असून, त्यांच्यावर हा हल्ला तुळजापूरमधील बारुळ गावानजीक झाला. गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सरपंचाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र त्यांच्या या घटनेने कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.
पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समजत आहे. कारण पवनचक्की स्थापनेच्या विषयावरून स्थानिक नेते आणि समुदायातील काही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता, मात्र त्यामधून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jawalega mesai sarpanch Attack l सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर :
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर आता धाराशिव जिल्ह्यातही सरपंचावर हल्ला झाल्याने स्थानिक समुदायात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेमुळे ग्रामीण क्षेत्रातील नेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
मात्र नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली आहे आणि हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच सरपंच नामदेव निकम यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
News Title : Jawalega mesai sarpanch namdev nikam Attack
महत्वाच्या बातम्या –
पुण्यात ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला, कारण वाचून थक्क व्हालं
जानेवारीत तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार; पाहा सुट्ट्यांची यादी
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर!






