भर मैदानात राडा! बुमराह आणि नायर यांच्यात झाली जोरदार बाचाबाची, पाहा व्हिडीओ

On: April 14, 2025 9:36 AM
Bumrah vs Karun Nair
---Advertisement---

Bumrah-Karun Nair Clash l आयपीएल 2025 मधील रंगतदार सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai indians)  यांच्यात भर मैदानात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि करुण नायर यांच्यात वाद झाला. सामन्याचा रोमहर्षक क्षण पाहणाऱ्यांसाठी ही घटना चर्चेचा विषय ठरली असून, बुमराहच्या (Bumrah-Karun Nair Clash) संतप्त प्रतिक्रिया आणि हार्दिक पांड्याची मध्यस्थी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

नायरचा फटकेबाज खेळ, बुमराहचा संताप :

सामना अतिशय चुरशीचा होता. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने दमदार खेळ केला, मात्र १९ षटकांत १९३ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. या विजयासह मुंबई इंडियन्सचा हंगामातील दुसरा विजय नोंदवण्यात आला. (Bumrah-Karun Nair Clash)

दिल्ली कॅपिटल्सकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेला करुण नायर जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने अर्धशतक पूर्ण करत ८९ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे त्याने जसप्रीत बुमराहच्या षटकात आक्रमक फलंदाजी केली आणि याच दरम्यान दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

Bumrah-Karun Nair Clash l हार्दिक पांड्याने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत :

ड्रिंक्स ब्रेक दरम्यान बुमराह आणि नायरमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं. यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली.

तर रोहित शर्मा (Rohit sharma)  बाजूला उभा राहून हे सर्व पाहत होता आणि हसत होता – त्याची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Bumrah-Karun Nair Clash)

News Title: Jasprit Bumrah-Karun Nair Clash Mid-Match, Hardik Pandya Intervenes – Watch Viral Video

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now