Japan Flu News | देशातील नागरिकांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. जगावर आणखी एका मोठ्या संकटाचं सावट आहे. जपानमध्ये फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. फ्लू झपाट्याने पसरत असल्यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. याचा थेट परिणाम आरोग्य सुविधांवर होत आहे. जपान सरकारने फ्लूची साथ देशभरात पसरल्याचे जाहीर केलं आहे. भविष्यात संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आणखी वाढल्यास लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवू शकते, असंही सांगितलं जात आहे. (Japan Flu News )
जपानमध्ये फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. एका आठवड्यात सुमारे ४००० हून अधिक नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तब्बल पाच आठवड्यांपूर्वी इन्फ्लूएंझाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने देशभरात ‘फ्लू महामारी’ घोषित केली आहे. शाळकरी मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, तज्ज्ञांनी ही परिस्थिती चिंताजनक असली तरी नवी महामारी नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
वेळेपूर्वीच प्रादुर्भाव :
फ्लूचा हंगाम साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू होतो, पण यंदा तो पाच आठवडे आधीच सुरू झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, फ्लू व्हायरसचा हा प्रकार अधिक शक्तिशाली असून तो वेगाने पसरत आहे. कोविड-१९ महामारीदरम्यान कमी संपर्कात राहिल्याने लोकांमध्ये फ्लूविरुद्धची नैसर्गिक प्रतिकारशक्ती (Immunity) कमी झाली असण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ही परिस्थिती मोठी जागतिक महामारीत बदलण्याची शक्यता नसली तरी अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्यांनी तात्काळ लसीकरण (Vaccination) करावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी. हा प्रादुर्भाव मुख्यतः H3N2 स्ट्रेनमुळे होत आहे, त्यावर मोठं संशोधन देखील झालं आहे. तरीही ही परिस्थिती चिंताजनक असल्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे सजगता आणि व्यापक लसीकरण अत्यंत आवश्यक आहे.
Japan Flu News | भारतासह इतर देशांनाही इशारा :
जपानमध्ये वाढलेल्या या फ्लूमुळे भारतासह इतर देशांसाठीही ही धोक्याची घंटा आहे. थंडीचा हंगाम जवळ येत असल्याने श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. हंगाम जवळ येत असल्याने श्वसनसंस्थेच्या आजारांचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे जपानच्या आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे.
रुग्णसंख्येतील वाढ रुग्णालयांवर ताण वाढला असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. मौसमी फ्लूचा प्रादुर्भाव असला तरी त्याचा वेळ आणि प्रमाण लक्षात घेता परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






