Janhvi Kapoor चा बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा; भर कार्यक्रमात घेतलं नाव, पाहा व्हिडीओ

On: January 2, 2024 1:58 PM
Janhvi Kapoor
---Advertisement---

Janhvi Kapoor | फिल्ममेकर करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’चा सध्या आठवा सीझन सुरू आहे. या सीझनमध्येदेखील एकापेक्षा एक धमाकेदार एपिसोड पाहायला मिळाले. आता ‘कॉफी विथ करण 8’च्या आगामी एपिसोडमध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूर या दोघी बहिणी हजेरी लावणार आहेत. या नव्या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

Janhvi Kapoor चा बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा

प्रोमोमध्ये करण जोहर जान्हवी आणि खुशी यांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. रॅपिड फायर राउंड दरम्यान, जान्हवी आणि खुशी त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसतात.

करणने जान्हवीला विचारले की तिने तिच्या मोबाईलमध्ये स्पीड डायलवर सेव्ह केलेले तीन नंबर कोणाचे आहेत?.  यावेळी बोलताना जान्हवी चुकून तिच्या बॉयफ्रेंडचं नाव घेते. तिच्या तोंडून माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं नाव बाहेर पडलं.

Janhvi Kapoor ने चुकून माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं घेतलं नाव

उत्तर देताना पटकन जान्हवी बोलून जाते, पापा, खुशू आणि शिखू. शिखू म्हणजेच शिखर पहाडिया. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. याआधी बॉलिवूडच्या पार्टी, देवदर्शन, हॉलिडे ट्रिप अशा अनेक ठिकाणी जान्हवी (Janhvi Kapoor) आणि शिखर सोबत दिसले होते.

जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात. या एपिसोडमध्ये फक्त जान्हवीलाच नाही तर खुशी कपूरलाही तिच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारला गेला. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

करण जोहरने जो आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर केला त्यामध्ये जान्हवी आणि खुशी या बहिणींचा स्टायलिश अवतार पाहायला मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

महत्त्वाच्या बातम्या- 

Disha Salian | दिशा सालियानविषयी अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

Maharashtra Politics | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

Aishwarya Rai-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय!

Kasganj News | ‘थंडीचा त्रास होतोय, मला बायको हवीये…’; तरूणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

Weather Update | ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now