जम्मू-काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली!

On: December 19, 2024 11:43 AM
Jammu -Kashmir Terrorists
---Advertisement---

Jammu Kashmir l जम्मू-काश्मीरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दहशतदवाद्यांविरोधात आज मोठी कारवाई केली आहे. तसेच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली आहे. ही सर्व घटना कुलगाम जिल्ह्याच्या बेहिबाग पीएस या भागातील कद्देर या गावाजवळ घडली आहे.

Jammu Kashmir l भारतीय सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांना केले ठार :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, आज कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दहशतदवाद्यांविरोधात मोठी कारवाई झाली आहे. यावेळी भारतीय सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले आहे. यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. तर या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी या भागात सर्च ऑपरेशन देखील सुरू केलं आहे. याशिवाय या घटनेत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात लष्कराच्या चिनार कॉर्प्सने माहिती दिली आहे. तसेच दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती लष्कर विभागाला मिळाली आहे. मात्र आता सुरक्षा दलांनी या भागात एक संयुक्त कारवाई देखील सुरू केली आहे. या लष्कराला या भागात काही संशयास्पद हालचाली देखील दिसल्या आहेत. तसेच दहशतवाद्यांनी गोळीबार देखील केला आहे.

News Title – Jammu -Kashmir Terrorists

महत्त्वाच्या बातम्या-

स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? घटनेचा व्हिडिओ समोर

“माझी नातवंडं टाहो फोडून रडतायत, तिघांनी शब्द दिला…”; मंत्रीपदावरून शिवतारे संतापले

वर्षाच्या शेवटी सोन्याची आनंदवार्ता, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

निवडणूक होताच प्रवाशांना पहिला झटका, लालपरीचा प्रवास महागणार?

आज गुरुवारी, देवी लक्ष्मी ‘या’ 3 राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now