फक्त 48 तासांत पॅनकार्ड मिळवणं आहे सोपं, ‘अशा’ पद्धतीनं करा अर्ज

On: December 16, 2022 2:09 PM
---Advertisement---

मुंबई | आता पॅनकार्ड(PAN Card) आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनलं आहे. बॅंकेतील(Bank) अनेक महत्वाच्या कामांसाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. त्यातच जर तुम्ही जाॅब करत असाल तर तुमच्याकडं पॅनकार्ड असणं गरजेचं आहे.

कधीकधी अशीही परिस्थीती येते की, तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी जाता आणि तिथं तुम्हाला पॅनकार्ड मागितलं जातं आणि तुमच्याकडं पॅनकार्ड नसतं. अशावेळी काय करावे सुचत नाही. म्हणूनच तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे, कारण आम्ही तुम्हाला फक्त 48 तासांत पॅनकार्ड मिळवण्याची प्रोसेस सांगणार आहोत.

पॅनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ही वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला पॅनकार्ड नवीन बनवायचं आहे की जुने पॅनकार्ड अपडेट करायचं आहे हे लिहावं लागेल.

यानंतर तुम्हाला तुमच पूर्ण नाव टाकावं लागेल. तसेच जन्मदिनांक टाकावी लागेल. तसेच ईमेल,मोबाईल नंबरही टाकावा लागेल. ही बेसिक माहिती भरून अर्ज सबमीट करावा. ही माहिती भरताना सावधगिरी बाळगावी.

या फाॅर्मसोबत तुम्हाला फी पण भरावी लागते. देशातील नागरिकांसाठी जीएसटीशिवाय 93 रूपये फी आहे. तर इतर देशातील नागरिकांसाठी 864 रूपये फी आहे. फी भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कागदपत्रेही पाठवावी लागतील.

तुम्ही पाठवलेल्या कागदपत्रांची पडताळणी होते. जर सर्व कागदपत्रे बरोबर असली तर तुम्हाला फक्त दोन दिवसांत पॅनकार्ड दिले जाते.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now