देशातील सर्वात मोठ्या संस्थेत नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?

On: October 14, 2024 2:09 PM
ISRO Apprentice 2025
---Advertisement---

ISRO Jobs 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठ्या संस्थेत नुकतीच भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता तरुणांनी लगेच अर्ज करण्यास सुरुवात करावी. याचे अर्ज भरणे देखील सुरू झाले आहे. आता ही भरती नेमकी कुठे होणार, किती जागांसाठी होणार ते पाहुयात. (ISRO Jobs 2024)

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी थेट isro मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. तब्बल 224 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. विविध पदे याद्वारे भरली जाणार आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या Human Space Flight Center (HSFC) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

ISRO त नोकरीची संधी

23 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार hsfc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या वेबसाइटवर भरतीबाबत सविस्तर माहिती मिळून जाईल.

या भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची देखील अट लागू करण्यात आली आहे. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग, बॅचलर, आयटीआय, B.Sc,  उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावीमध्ये 60 टक्केपेक्षा अधिक गुण असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. 60 पेक्षा कमी गुण दहावीमध्ये नसावेत ही मुख्य अट ठेवण्यात आलीये. (ISRO Jobs 2024)

वयाची अट काय?

वयाची अट ही पदानुसार ठेवण्यात आली आहे. पदानुसार उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 28, 30 किंवा 35 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. (ISRO Jobs 2024)

News Title :  ISRO Jobs 2024

महत्वाच्या बातम्या-

महागड्या गाड्या, आलिशान घर, बाबा सिद्दीकींच्या संपत्तीचा आकडा समोर

आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंकडून टोलमाफीची घोषणा, पण नेमकी कुठे?

राज्यात ‘या’ दिवशी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता?

शाहरुख खानच्या मुलावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप; म्हणाली, “तो मला प्रायव्हेट व्हिडिओ..”

Join WhatsApp Group

Join Now