पेट्रोल-डिझेलसह सोन्याचे दर गगनाला भिडणार, धक्कादायक कारण आलं समोर

On: June 23, 2025 11:45 AM
Today Petrol Diesel Price
---Advertisement---

Israel Iran War Effect | इराण आणि इस्रायलमधील (Israel-Iran) युद्ध आणखी तीव्र झालं असून, आता अमेरिकाही या संघर्षात उतरली आहे. अमेरिकेने इराणच्या अणुसंशोधन केंद्रांवर हल्ला केल्यानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. याचा थेट परिणाम इंधन दर, सोन्याच्या किंमती आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Israel-Iran War May Spark Economic Crisis)

आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूड फ्युचर्सचे दर एका आठवड्यात तब्बल ११ टक्क्यांनी वाढले असून प्रति बॅरल दर ८० डॉलर्सवर पोहोचले आहेत. इराण हा तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा असलेला देश असून, चीन, भारत, जपान, इटली आणि ग्रीस यासारखे देश त्याच्यावर तेलासाठी अवलंबून आहेत.

पेट्रोल-डिझेल 230 रुपये प्रति लिटरपर्यंत जाण्याची शक्यता? :

इराणमधील तेल आणि गॅस क्षेत्रांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे उत्पादन ठप्प झालं आहे. हैफा रिफायनरीही बंद करण्यात आली आहे. Goldman Sachs च्या अहवालानुसार, जर युद्ध सुरूच राहिलं, तर कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. भारतात पेट्रोल-डिझेलचे दर २००–२३० रुपये प्रति लिटरच्या आसपास पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे.

HPCL, BPCL आणि IOCL सारख्या कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होईल. पेट्रोलियम आयात महाग झाल्याने सरकारवरही अनुदानाचा भार वाढेल.

Israel Iran War Effect | महागाईचा भडका आणि रिझर्व्ह बँकेसमोर संकट :

भारतासह जगभरात अन्नधान्य, कपडे, रसायने यांच्याही किमतीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका व्याजदर कपातीच्या धोरणावर पुनर्विचार करू शकतात. सध्या भारतात महागाई नियंत्रणात आहे, पण युद्धजन्य परिस्थितीने ती पुन्हा बळावण्याचा धोका आहे. (Israel-Iran War May Spark Economic Crisis)

अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. अलिकडेच सोन्याने १ लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. आता युद्धामुळे सोन्याच्या दरात आणखी तेजी येईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढेल, आणि त्यामुळे भाव नव्या उच्चांकी पोहोचू शकतात.

शेअर बाजारात अस्थिरता :

शुक्रवारी सेन्सेक्स १०४६ अंकांनी वाढला असला तरी येणाऱ्या काळात युद्धामुळे बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार सावध झाले असून, जागतिक गुंतवणूकदारांचा कल सोन्याच्या किंवा डॉलरकडे वळण्याची चिन्हं आहेत.

News Title: Israel-Iran War May Spark Economic Crisis: Petrol Prices May Soar, Gold Rates to Hit Record Highs

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now