Islampur | सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात गुरुवारी दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत कुख्यात गुंड नितीन पालकर (Nitin Palkar) याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाला बेसबॉल बॅटने मारहाण करून ठार मारण्यात आले.
कुख्यात गुंडाचा भरदिवसा शेवट
इस्लामपूरमधील (Islampur) गुन्हेगारी जगतात दबदबा असलेल्या नितीन पालकर (Nitin Palkar) याचा गुरुवारी दुपारी खून झाला. वाळवा (Walwa) बाजार समोर एका पान टपरीजवळ तो थांबला असताना, दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. पालकरवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता इस्लामपूर (Islampur) पोलिसांनी त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाईही केली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या त्याच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या
दुसऱ्या एका घटनेत, इस्लामपूर (Islampur) जवळ राष्ट्रीय महामार्गालगत (National Highway) असलेल्या वाघवाडी फाट्यावर (Wagwadi Phata) सौरभ राजेंद्र केर्लेकर (Saurabh Rajendra Kerlekar) (वय ३०, रा. माळगल्ली, इस्लामपूर) या तरुणाचा खून करण्यात आला. सौरभ रुग्णवाहिका चालक आणि डीजे ऑपरेटर म्हणून काम करत होता. नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अवघ्या १२ तासांत अरविंद उर्फ राघू सुभाष साटम (Arvind alias Raghu Subhash Satam) आणि किरण रामचंद्र सातपुते (Kiran Ramchandra Satpute) या दोन संशयितांना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. राघू (Raghu Satam), जो सौरभचा नातेवाईक आहे, त्याने मंगळवारी रात्री उशिरा सौरभला (Saurabh Kerlekar) वाघवाडी फाट्यावरील (Wagwadi Phata) ढाब्याजवळ बोलावून घेतले. वादावादीनंतर किरणने (Kiran Satpute) सौरभला धरले आणि राघूने (Raghu Satam) लाकडी बेसबॉल बॅटने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर जबर मारहाण केली, ज्यात सौरभचा मृत्यू झाला.
Title : Islampur Shaken: Gangster, Youth Killed in Separate Murders






