इशान किशनचा प्रामाणिकपणा त्यालाच नडला! सेहवागने सुनावलं, अंपायरचा वादग्रस्त निर्णय!

On: April 24, 2025 1:48 PM
Ishan Kishan
---Advertisement---

Ishan Kishan l सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात इशान किशनने जे केलं, ते खरं तर ‘स्पोर्ट्समनशिप’ मानलं जातं. पण माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag on Ishan) मात्र या कृतीवर चांगलेच भडकले. “पंचांना त्याचं काम करू दे! तू तुझं काम कर!” असा थेट सल्ला त्यांनी इशान किशनला दिला आहे.

सेहवाग म्हणतो – “हे कुठलं प्रामाणिकपण?” :

घटनेनुसार, SRH च्या डावात दीपक चाहरने टाकलेल्या चेंडूवर इशान किशनला बाद दिलं गेलं. मात्र विशेष म्हणजे त्या चेंडूवर कोणत्याही मुंबई खेळाडूने अपील केलं नव्हतं. तरीही इशान किशन स्वतःहून मैदान सोडायला निघाला आणि पंचही गोंधळात सापडले. आधी हात वर केला, मग खाली, मग पुन्हा वर… आणि अखेर इशान बाद! (Virender Sehwag on Ishan)

यासंदर्भात वीरेंद्र सेहवाग म्हणाले, “मित्रा, पंच पैसे घेतो, तो उभा आहे निर्णय द्यायला. जर तो निर्णय देत नाही, तर तू का चाललास? पंचाला त्याचं काम करू दे. तू बॅटिंग करायला आलायस, तीच कर.” ते पुढे म्हणाले, “जर बॉल बॅटला लागला असता, तर समजलं असतं. पण तसं काही झालंच नाही. तरीही तू चालतोयस. आणि पंचही गोंधळात पडतो. ही प्रामाणिकपणाची गोष्ट मला काही पचली नाही.”

Ishan Kishan l रिकी पॉन्टिंगचं उदाहरण देत सेहवागचा टोला :

सेहवागने रिकी पॉन्टिंगचं उदाहरण देत सांगितलं की, “मी इथे फलंदाजी करायला आलोय, पंच त्याचा निर्णय देईल, तोपर्यंत मी जागचा हलणार नाही. मी बाद असलो किंवा नसलो तरी, पंच सांगतो तो निर्णय अंतिम असतो.” (Ishan Kishan Out Controversy)

या प्रकारामुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे. काहींनी इशानच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं, तर काहींनी ते “मुर्खपणाचं प्रदर्शन” म्हटलं. अंपायरिंगच्या (Ishan Kishan Out Controversy) या गोंधळामुळे सामन्याचं रंगतदार वातावरण क्षणभर गोंधळात गेलं.

News Title: Ishan Kishan’s Honesty Backfires in MI vs SRH; Sehwag Says ‘Let the Umpire Do His Job!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now