‘या’ खेळाडूमुळे हैदराबादचे 11 कोटी पाण्यात! काव्या मारनची चिंता वाढली

On: May 3, 2025 10:28 AM
SRH
---Advertisement---

SRH | सनरायझर्स हैदराबादने या हंगामात सात सामने गमावले असून, संघाची प्लेऑफमधील आशा जवळपास संपुष्टात आली आहे. संघाने आता फक्त तीन सामने जिंकले असून सहा गुणांसह तळाच्या स्थानावर आहे. संघाच्या सातत्याने होणाऱ्या पराभवासाठी अनेक कारणं सांगितली जात असली तरी, इशान किशन या खेळाडूवर सर्वाधिक टीका होत आहे. (SRH Point Table)

11 कोटींचा विश्वास फसला! :

हैदराबादच्या टीम मालक काव्या मारन यांनी इशान किशनवर तब्बल 11.25 कोटी रुपये खर्च केले होते. पहिल्या सामन्यात त्याने 106 धावांची नाबाद खेळी करत चमक दाखवली होती. मात्र त्यानंतरच्या 9 सामन्यांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. (Ishan Kishan Flop)

दरम्यान, गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने 17 चेंडूत केवळ 13 धावा केल्या आणि त्यात एकही चौकार किंवा षटकार नव्हता. संघासमोर मोठं लक्ष्य असताना त्याचं संथ खेळणं नुकसानदायक ठरलं.

SRH | आकडेवारीनं दाखवली खरी स्थिती :

यंदाच्या हंगामात इशान किशनने (Ishan Kishan) 10 सामन्यांत केवळ 183 धावा केल्या आहेत. त्याचा सरासरी 26.14 असून स्ट्राईक रेट 153 आहे. या आकड्यांवरून त्याची खेळी प्रभावी वाटत असली तरी प्रत्यक्षात त्याचा फॉर्म एकाच सामन्यापुरता टिकला. विशेष म्हणजे, इशान किशन 6 वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे, हे त्याच्या अस्थिर कामगिरीचं द्योतक आहे.

हैदराबादच्या संघाकडून अजूनही प्लेऑफसाठी थोडी आशा उरली आहे, मात्र त्यासाठी उर्वरित सामने जिंकणं अत्यावश्यक आहे. मात्र अशा स्थितीत जेव्हा प्रमुख खेळाडूंचा फॉर्म डळमळीत असतो, तेव्हा संघाचं एकूण प्रदर्शन अपयशी ठरतं. इशान किशनसारख्या महागड्या खेळाडूकडून अपेक्षा मोठ्या असतात, पण तो त्या पूर्ण करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे.

News Title: Ishan Kishan Flops Again, Kavya Maran’s ₹11 Crore Investment Under Fire After SRH’s 7th Loss

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now