मुंबई-हैदराबादची मॅच फिक्स होती का?, इशान किशनला बाद देताना पंचांचा गोंधळ

On: April 24, 2025 1:06 PM
Ishan Kishan Wicket
---Advertisement---

Ishan Kishan Wicket l मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगलेल्या सामन्यात एक विचित्र आणि गोंधळलेली घटना घडली. इशान किशनच्या विकेटवरून मैदानावरचा गोंधळ इतका वाढला की पंचांनी एकदा हात वर केला, मग खाली केला आणि शेवटी पुन्हा वर केला! या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Ishan Kishan)

इशान किशननं DRS घेतला असता तर…? :

मुंबईकडून (MI) गोलंदाजी करताना दीपक चहरने (Dipak Chahar) तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर इशान किशनला बाद केलं. मात्र बॉल त्याच्या बॅटला लागलाच नव्हता, तो लेग साइडवरून रियान रिकल्टनकडे गेला.

या चेंडूवर मुंबईच्या खेळाडूंनी जोरात अपील केलंच नाही, त्यामुळे पंच गोंधळात सापडले. सुरुवातीला त्यांनी बादचा इशारा केला, मग अपील न दिसल्यामुळे बोट खाली केलं, आणि पुन्हा अपील आलं तसं हात वर केला!

Ishan Kishan Wicket l पंचांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित :

इशान किशनने DRS न घेताच थेट पॅव्हेलियन गाठलं. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसून आलं की बॉल बॅटला लागलाच नव्हता. या निर्णयावरून सोशल मीडियावर चाहते आणि क्रिकेट विश्लेषकांनी पंचांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादवनेही (Surykumar Yadav) मजेशीर शैलीत इशानला ‘पाठीवर हात ठेवून’ पॅव्हेलियनकडे पाठवलं.

सनरायजर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 143 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 71, तर अभिषेक मनोहरने 43 धावा करत 99 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. मुंबईकडून दीपक चाहर आणि ट्रेंट बोल्टने सुरुवातीला दोन-दोन विकेट घेत सामन्याचा रंग बदलला.

News Title: Ishan Kishan Controversial Wicket: Umpire Confusion Goes Viral in SRH vs MI IPL 2025 Match

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now