शुबमन गिल लवकरच लग्न करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

On: April 22, 2025 1:25 PM
Shubman Gill Marriage
---Advertisement---

Shubman Gill Marriage l आयपीएल 2025 च्या रंगतदार सामन्यांमध्ये मैदानावरच्या खेळाइतकाच टॉसच्या क्षणांमधील मजेशीर संवादही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. यंदा चर्चेत आहे गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल, ज्याला टॉस दरम्यान थेट लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न विचारणारे होते आयपीएलचे लोकप्रिय टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसन, आणि गिलने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डॅनी मॉरिसनच्या धाडसी प्रश्नाने रंगत आणली :

सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यापूर्वी ईडन गार्डन्सवर झालेल्या टॉसदरम्यान मॉरिसनने गिलला विचारलं, “तू लवकरच लग्न करणार आहेस का?” यावर गिल हसून म्हणाला, “नाही, असं काही नाहीये.” या छोट्या उत्तराने प्रेक्षकांच्या मनात मात्र अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

डॅनी मॉरिसन हे त्यांच्या हटके आणि धाडसी प्रश्नांसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी सर्वसामान्य क्रिकेटविषयक प्रश्न न विचारता थेट गिलच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारला, जो अनेकांना अनपेक्षित वाटला. सोशल मीडियावर चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले, “फक्त डॅनी मॉरिसनच हे विचारू शकतो!”

Shubman Gill Marriage l गुजरातचा जबरदस्त फॉर्म – गिलचा नेतृत्वात कमाल :

शुबमन गिलचं नेतृत्व सध्या गुजरात टायटन्ससाठी फलदायी ठरत आहे. संघाने आठपैकी सहा सामने जिंकून 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली आहे. दुसरीकडे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ केवळ तीन सामने जिंकू शकला आहे.

गिलने लग्नाबाबत स्पष्टपणे “नाही” असं उत्तर दिलं असलं तरी, त्याच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि टाळण्याच्या शैलीने चाहत्यांना अजूनच उत्सुकतेत टाकलं आहे. आता गिल खरंच लग्नाच्या तयारीत आहे की नाही, याचा उलगडा पुढेच होणार आहे!

News Title: Is Shubman Gill Getting Married Soon? Danny Morrison’s Question Sparks Buzz During IPL Toss

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now