IRCTC चं नोव्हेंबर स्पेशल टुर पॅकेज, ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी!

On: October 11, 2024 1:33 PM
IRCTC Travel Plan for madhya pradesh
---Advertisement---

IRCTC Travel Plan | ऑक्टोबर महिन्यापासून गुलाबी थंडी पडायला सुरुवात होते. पुढील काही महीने आता थंडीचे आहेत. या दिवसांत अनेक लोक पर्यटनाचा प्लॅन बनवतात. कुणी डोंगराळ प्रदेशात भेटी देतात तर कुणी धार्मिक ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेतात. पुढच्या महिन्यात दिवाळी हा मोठा सण आहे. या काळात बऱ्याच दिवस सुट्ट्या असतात. या दिवाळीच्या सुट्टीसाठी तुम्ही जर मध्य प्रदेशमधील ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. (IRCTC Travel Plan )

भारतीय रेल्वे IRCTC नेहमीच पर्यटकांसाठी कमी बजेटमध्ये देशी आणि विदेशी टूर पॅकेज आणते. या टूर पॅकेजेसच्या माध्यमातून पर्यटक कमीत कमी बजेटमध्ये सोयीस्कर प्रवास करतात. यंदा IRCTC ने प्रवाशांसाठी मध्य प्रदेश ‘महादर्शन टूर’ पॅकेज आणले आहे.

भारतीय रेल्वेच्या IRCTC चे हे टूर पॅकेज एकूण 5 दिवसांचे असून, ‘देखो अपना देश’ अंतर्गत सादर करण्यात आले आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये प्रवासी उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आणि इंदूरला भेट देतील. नोव्हेंबर महिन्यासाठी हे स्पेशल टुर पॅकेज आहे.

‘महादर्शन टूर’ पॅकेज कसे बुक करता येईल?

IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना निवास आणि भोजन मोफत दिले जाईल. अनेक टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही दिली जाते. नोव्हेंबर महिन्यातील मध्य प्रदेश महा दर्शन टूर पॅकेज हे एकूण 4 रात्री आणि 5 दिवसांचे असणार आहे. येत्या 6 नोव्हेंबरपासून याची सुरुवात होणार आहे. (IRCTC Travel Plan )

आरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून पर्यटक हे टूर पॅकेज बुक करू शकतात. यासोबतच प्रवासी 8287932229 या क्रमांकावर कॉल करून देखील टूर पॅकेज बुक करू शकतात. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक फ्लाइट मोडने प्रवास करतील. हे टूर पॅकेज हैदराबादपासून सुरू होणार आहे.

टुर पॅकेजचे दर काय असणार?

यामध्ये एकट्या व्यक्तीसाठी 35,450 रुपये आकारण्यात येतील. जर तुम्ही दोन लोकांसोबत टूर पॅकेजमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 28, 950 रुपये मोजावे लागतील. तीन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 27,900 रुपये आकारले जातील. जर तुम्ही 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसोबत टूर पॅकेजमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती भाडे 21, 450 रुपये द्यावे लागतील. तसेच, जर तुम्ही टूर पॅकेजमध्ये 2 ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती भाडे 18, 950 रुपये द्यावे लागतील. (IRCTC Travel Plan )

News Title –  IRCTC Travel Plan for madhya pradesh 

महत्त्वाच्या बातम्या-

दोन अग्नीवीरांचा मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून अंगावर येईल काटा

पुणे हादरलं! प्रेयसीला लॉजवर नेलं अन् त्याने..; पुढचा घटनाक्रम ऐकून थरथराल

पुण्यातील ‘या’ भागात भरधाव ऑडीने दुचाकीस्वाराला चिरडलं…

गुड न्यूज! दसऱ्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर!

यंदा राज्यात होणार तब्बल 6 दसरा मेळावे; कुणाचा कुठे आणि कधी होणार मेळावा?

Join WhatsApp Group

Join Now