31 ची पार्टी करा आलीशान क्रूझवर, IRCTC चे स्पेशल ‘क्रूझ टूर पॅकेज’कसं बुक कराल?

On: December 19, 2024 12:11 PM
IRCTC Special Cruise Tour Package
---Advertisement---

IRCTC | नवीन वर्ष सुरू होण्यास आता फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री पार्ट्या केल्या जातात. अनेक जण या प्रसंगी आवडत्या ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करतात. तुम्हीही 31 (डिसेंबर) साठी काही प्लॅन करत असाल तर एकदा ही बातमी नक्की वाचा. (IRCTC)

आलीशान क्रूझवर एकदा तरी जाऊन धम्माल-मस्ती करावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. एकदा तरी क्रूझने प्रवास करावा, असं अनेकांना वाटतं. पण अनेकांना या क्रूझचे तिकीट कसे बूक करावे हे माहित नसते. तसेच, याच्या किमती देखील खूप जास्त असतात. मात्र, आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना खासगी कंपन्यांकडून खास क्रूझ टूर पॅकेज सुविधा आणली आहे.

भारतीय रेल्वे क्रूझ टूर पॅकेजमध्ये परवडणाऱ्या दरात लक्झरी सुविधा दिल्या जातात. या स्पेशल पॅकेजमध्ये प्रवास, निवास, जेवण आणि जहाजावरील मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत. आता हे पॅकेज बुक कसे करायचे, त्याची किंमत किती असेल याबाबत जाणून घेऊयात-

IRCTC चे ‘क्रूझ टूर पॅकेज’

भारतीय रेल्वे प्रवाशांना खासगी कंपन्यांकडून स्पेशल क्रूझ पॅकेज सुविधाही देत ​​आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर, तुम्हाला टूर पॅकेजमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि बजेटबद्दल तपशीलवार माहिती वाचायला मिळेल. या पॅकेजमध्ये प्रवास, निवास, जेवण आणि जहाजावरील मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत. (IRCTC)

क्रूझ टूर पॅकेज कसे बुक करणार?

सर्वप्रथम irctctourism.com या वेबसाईटवर जा.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर, सर्वप्रथम तुम्हाला स्थानानुसार वेगवेगळ्या पॅकेजची नावे दिसतील.
याठिकाणी तुम्हाला हॉटेल, फ्लाइट, पॅकेज आणि क्रूझ सारख्या तिकीट बुकिंगचे आयकॉन दिसतील.
क्रूझ टूर पॅकेज बुक करायचे असेल तर तुम्ही त्यावर क्लिक करू शकता.
यानंतर, तुमच्यासमोर दोन प्रकारचे पॅकेज पर्याय उघडतील.
यामध्ये तुम्हाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज बुक करण्याचा पर्याय येईल.
यात तुम्ही IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तिकीट बुक करू शकता.
येथे वेगवेगळ्या ठिकाणांहून धावणारी क्रूझ पॅकेजेस तुमच्यासमोर दिसतील. (IRCTC)

बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करा

टूर पॅकेज सिलेक्ट केल्यावर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, तुमचे नाव, नंबर, किती लोक प्रवास करणार आहेत आणि मुलेही तुमच्यासोबत जाणार आहेत की नाही अशी माहिती द्यावी लागेल. सर्व तपशील दिल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून एक मेल येईल. या मेलमध्ये तुम्हाला संदर्भ क्रमांक मिळेल. यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेकडून कॉल येईल.त्यानंतर तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून टूर पॅकेज बुक करू शकाल. (IRCTC)

https://www.irctctourism.com/international-holidays/cruise-tour-packages

News Title –  IRCTC Special Cruise Tour Package

महत्त्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली!

स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? घटनेचा व्हिडिओ समोर

“माझी नातवंडं टाहो फोडून रडतायत, तिघांनी शब्द दिला…”; मंत्रीपदावरून शिवतारे संतापले

वर्षाच्या शेवटी सोन्याची आनंदवार्ता, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

निवडणूक होताच प्रवाशांना पहिला झटका, लालपरीचा प्रवास महागणार?

Join WhatsApp Group

Join Now