१ ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगचे नवीन नियम लागू!

On: September 24, 2025 6:19 PM
Pune Railway News
---Advertisement---

IRCTC Rule | भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग पद्धतीमध्ये मोठे बदल केले असून १ ऑक्टोबरपासून ते अमलात येणार आहेत. आता येणाऱ्या दिवाळीच्या गर्दीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे नियम खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण आता आधार लिंक न करता तिकीट बुकिंग करणे अवघड होणार आहे.

आत्तापर्यंत IRCTC खात्याद्वारे तिकीट बुक करताना फक्त लॉगिन प्रक्रिया पुरेशी होती. मात्र, १५ जुलै २०२५ पासून रेल्वे मंत्रालयाने OTP पडताळणीची अट घातली आहे. त्यामुळेच आता IRCTC खातं आधार सोबत जोडणे बंधनकारक झाले आहे. आता तिकीट बुक करताना प्रवाशांच्या आधारशी नोंदलेल्या मोबाईलवर OTP येईल आणि तो टाकल्याशिवाय बुकिंग प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

जाणून घ्या बदललेले नियम:

मात्र यामुळे दलालांचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि प्रवाशांना समान संधी मिळावी म्हणून रेल्वे प्रशासनाने काही ठोस पावले उचलली आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे तात्काळ आणि जनरल तिकिटांसाठी आधारशी जोडणी बंधनकारक असेल.

१ ऑक्टोबर पासून जर तुम्ही IRCTC ॲप किंवा वेबसाईटवरून जनरल तिकीट बुकिंग करणार असाल, तर ई-आधार पडताळणी गरजेची आहे. रिझर्वेशन विंडो चालू झाल्यावर पहिल्या १५ मिनिटात फक्त आधारशी जोडलेले वापर करतेच तिकीट बुक करू शकतील. यामुळे सामान्य प्रवाशांना अधिक प्राधान्य मिळेल.

तिकिटांसाठी कोणतेही ओळखपत्र आवश्यक नाही :

स्टेशन काउंटर वरील जनरल तिकिटांसाठी मात्र कोणतेही ओळखपत्र आवश्यक नाही. आत्ता सारखेच खिडकीतून सहजपणे तिकीट घेता येणार. ही प्रक्रिया फक्त ऑनलाईन बुकिंग साठीच लागू राहील.

यामध्ये एजंट्ससाठीही ही मोठा बदल करण्यात आला आहे. तात्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत IRCTC एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत. यामुळे तिकीट थेट सामान्य प्रवाशांना मिळण्याची शक्यता वाढेल. त्याचबरोबर एसी क्लासचे तिकीट सकाळी १०:०० ते १०:३० आणि नॉन-एसी क्लास चे तिकीट ११:०० ते ११:३० या वेळेत उपलब्ध होतील.

रेल्वेने केलेले हे बदल :

तुमचे IRCTC खाते आधारशी जोडण्यासाठीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे: ‘My Account’ सेक्शन मध्ये आधार क्रमांक टाकून, मोबाईलवर आलेल्या OTP ने पडताळणी केली की खाते आधारसोबत लिंक होते.

रेल्वेने केलेले हे बदल बनावट बुकिंग रोखण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना सणासुदीच्या काळात सहज तिकीट मिळावे यासाठी आहेत. यामुळे पुढच्या वेळी तिकीट बुक करण्याआधी तुमचे IRCTC खाते आदर्श जोडलेले आहे की नाही याची खात्री करा.

News title : IRCTC New Rule 2025

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now