IPL च्या पंचांचा पगार ऐकून व्हाल थक्क! जाणून घ्या एका सामन्याचं मानधन किती?

On: June 6, 2025 12:42 PM
IPL Umpires Salary
---Advertisement---

IPL Umpires Salary | क्रिकेटमध्ये नेहमी खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाची चर्चा होते. मात्र, प्रत्येक सामन्याचा निर्णय आणि निष्पक्षतेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंचांबद्दल फार कमी बोललं जातं. ते सतत तंदुरुस्त राहून, मानसिक एकाग्रता जपत, निर्णायक भूमिका बजावतात.

पण आता त्यांच्या मानधनाबाबत माहिती समोर आली असून, ती आश्चर्यचकित करणारी आहे. भारतीय क्रिकेट मंडळाकडून (BCCI) आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) यामध्ये पंचांना दर सामन्यानुसार मोठं मानधन दिलं जातं. (IPL Umpires Salary)

देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कमाई :

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंचांचे मानधन त्यांच्या अनुभव आणि श्रेणीनुसार ठरते. एका दिवसासाठी त्यांना सुमारे ३० ते ४० हजार रुपये दिले जातात. चार दिवसांच्या सामन्यासाठी त्यांना १.६ लाख रुपयांपर्यंत मानधन मिळते.

या सामन्यांमध्ये पंचांना केवळ मैदानावरच नव्हे, तर संपूर्ण सामन्यात सतर्क राहण्याची गरज असते. त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण सामन्याचे चित्र बदलू शकते, म्हणूनच त्यांच्या भूमिकेचं विशेष महत्त्व असतं. (IPL Umpires Salary)

IPL Umpires Salary | IPL मध्ये पंचांना मिळतं ‘करोडपती’ मानधन! :

आयपीएल म्हणजेच ग्लॅमर आणि स्पर्धेचं केंद्रबिंदू, तिथं पंचांनाही त्यांच्या भूमिकेनुसार भरघोस मानधन दिलं जातं. चौथे पंच (TV umpire) एका सामन्यासाठी २ लाख रुपये, तर मैदानावरील पंचांना ३ लाख रुपये मिळतात.

त्यांच्याकडून चूक अपेक्षित नसते कारण प्रत्येक निर्णयावर DRS, Ultra Edge, Slow Motion Replays यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांचे लक्ष असते. त्यामुळे मानसिक दबाव देखील खूप मोठा असतो.

पंचांचं मानसिक आणि तांत्रिक प्रशिक्षण अत्यंत काटेकोर :

या स्तरावर पंच म्हणून काम करणं म्हणजे तंदुरुस्तीबरोबरच प्रखर मानसिक ताकद, निर्णयक्षमतेचा कस आणि तांत्रिक समज या सर्वांची गरज असते. पंचांना नियमित प्रशिक्षण, मूल्यांकन, आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून (IPL Umpires Salary 2025) घेणं आवश्यक असतं.

त्यांना डीआरएस, अल्ट्रा एज, बॉल ट्रॅकिंग यांसारख्या प्रणालींचा अचूक वापर समजावून घ्यावा लागतो. त्यामुळे पंच होणं म्हणजे केवळ निर्णय देणं नव्हे, तर सतत शिकणं आणि सुधारण्याची प्रक्रिया असते.

News Title: IPL Umpires Salary 2025: You Won’t Believe How Much Indian Cricket Umpires Earn Per Match!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now