IPL 2025 | आयपीएल 2025 च्या प्लेऑफ फेरीत थरारक वातावरण पाहायला मिळत आहे. 1 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर-2 सामना होणार आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येणार आहेत. मात्र, हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने हा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अंतिम सामन्यात कोण प्रवेश करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
फायनलमध्ये कोण? – असं आहे गणित :
आयपीएलच्या नियमांनुसार, क्वालिफायर-2 सामना जर पावसामुळे रद्द झाला आणि राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही, तर लीग टप्प्यात जास्त गुण मिळवलेल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश दिला जातो.
या हंगामात पंजाब किंग्सने लीग स्टेजमध्ये 21 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते, तर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर जिंकून क्वालिफायर-2 मध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास पंजाब किंग्स थेट फायनलमध्ये आरसीबीशी भिडणार.
IPL 2025 | आयपीएल प्लेऑफ फॉरमॅट समजून घ्या :
क्वालिफायर-1: पहिल्या दोन स्थानावरील संघांत (पंजाब किंग्स आणि आरसीबी) सामना. विजेता थेट फायनलमध्ये.
एलिमिनेटर: तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघांत (मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स) सामना. विजेता क्वालिफायर-2 मध्ये.
क्वालिफायर-2: क्वालिफायर-1 चा पराभूत संघ व एलिमिनेटरचा विजेता यांच्यात सामना. विजेता फायनलमध्ये.
पंजाब फायनलमध्ये का? :
पंजाब किंग्सचा लीग स्टेजमधील दर्जा अधिक असल्यामुळे आणि त्यांचा नेट रनरेट +0.376 असल्याने, नियमांनुसार त्यांना फायनलमध्ये खेळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, जर सामना पूर्णतः रद्द झाला, तर पंजाब किंग्सचाच अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित होईल.
BCCIने अशा परिस्थितीचा विचार करून राखीव दिवस ठेवलाय. जर 1 जूनला सामना पूर्ण न खेळवता आला, तर 2 जूनला उर्वरित सामना होणार. मात्र, किमान 5-5 षटकांचा खेळ झाला पाहिजे, अन्यथा सामना रद्द मानला जाईल आणि निर्णय गुणांवरच घेतला जाईल.






