RCB vs PBKS : सगळे गडबडले… पण त्याने मान राखली! सातव्या क्रमांकावर येऊन केली वादळी खेळी

On: April 19, 2025 9:03 AM
IPL 2025 Tim David
---Advertisement---

IPL 2025 | पावसामुळे फक्त 14 षटकांचा झालेल्या सामन्यात आरसीबीची फलंदाजी अक्षरशः कोलमडली होती. पण एका फलंदाजाने शेवटपर्यंत झुंज देत नवा विक्रम केला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात (RCB) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना अत्यंत खराब सुरुवात केली. (PBKS) पंजाबचा कर्णधार (Shreyas Iyer) श्रेयस अय्यरने टॉस जिंकून गोलंदाजी निवडताच आरसीबीला मोठा झटका बसला.  पॉवरप्लेमध्येच आरसीबीने तीन विकेट्स गमावल्या. (IPL 2025)

टीम डेविडने सावरला डाव 

फिल सॉल्ट केवळ ४ धावा करून बाद झाला आणि त्यानंतर विराट कोहलीही अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर केवळ १ धाव करून तंबूत परतला. लिव्हिंगस्टोनदेखील ४ धावांवर बाद झाल्याने डाव कोसळतोय असं वाटू लागलं. रजत पाटीदार आणि कृणाल पंड्याही काही विशेष करू शकले नाहीत.

यावेळी टीम डेविडने (Tim David) सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सामना पूर्णपणे बदलून टाकला. त्याने केवळ २५ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकत आरसीबीला ९५ धावांपर्यंत नेलं.

सातव्या क्रमांकावर येत अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज

टीम डेविडच्या या अर्धशतकामुळे त्याने एक ऐतिहासिक कामगिरी केली. सातव्या क्रमांकावर येऊन अर्धशतक ठोकणारा तो केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. याआधी (Dinesh Karthik) दिनेश कार्तिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६६ धावांची नाबाद खेळी करत असा पराक्रम केला होता.

डेविडच्या या खेळीमुळे जरी आरसीबीचा डाव ९५ धावांवर संपला तरी संघाने सन्मानजनक स्कोअर केला. सामना गमावल्यानंतरही डेविडच्या खेळीची चर्चा रंगली.

RCB विरुद्ध PBKS प्लेइंग XI

RCB: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेविड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल

PBKS: प्रियांश आर्य, नेहल वढेरा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

Title : IPL 2025 Tim David’s Heroics Save RCB from Collapse

 

Join WhatsApp Group

Join Now