प्लेऑफसाठी चेन्नईचा गेमचेंजर प्लॅन! ‘हे’ बदल ठरतील निर्णायक!

On: April 15, 2025 9:55 AM
IPL 2026
---Advertisement---

CSK l आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने अखेर एलएसजी संघाविरुद्ध दुसरा विजय मिळवून हंगामात पुन्हा एक संधी मिळवली आहे. पाच गडी राखून मिळालेला हा विजय महत्त्वाचा असला तरी, संघाच्या गुणतालिकेत फारसा बदल झालेला नाही. CSK अजूनही दहाव्या स्थानी असून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.

CSK l धोनीचा फॉर्म आणि नेतृत्व आशादायक :

CSK संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यापैकी फक्त दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ ४ गुण आहेत. अजून सात सामने बाकी आहेत आणि सर्व सामने जिंकल्यास चेन्नईला १४ गुण मिळतील. आधीच्या ४ गुणांची भर घालून संघाचे एकूण १८ गुण होऊ शकतात. अशा परिस्थितीत ते सहजपणे टॉप 4 मध्ये पोहोचू शकतात.

सीएसकेचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS dhoni) एलएसजीविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी करताना केवळ ११ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. २०२३ मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा धोनी, यंदा फारसा आघाडीवर दिसलेला नाही. मात्र जेव्हा गरज भासते, तेव्हा तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून आले.

प्रत्येक सामना ‘करो किंवा मरो’ ठरणार :

सध्या एकाही संघाने प्लेऑफसाठी थेट पात्रता मिळवलेली नाही, किंवा बाहेरही पडलेले नाही. त्यामुळे टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला संधी आहे. मात्र, वरच्या स्थानावर असलेल्या संघांना मार्ग सोपा आहे, तर तळाच्या संघांना पुढे जाण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

एकूणच, चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) हंगामातील पुढील प्रत्येक सामना ‘करो किंवा मरो’ ठरणार आहे. संघ जर सलग विजय मिळवू शकला तर चाहत्यांची आशा पुन्हा उंचावेल, अन्यथा हंगाम याच टप्प्यावर थांबण्याची शक्यता आहे.

News Title : IPL 2025: Still in Playoff Race – But Dhoni’s Team Must Win All Remaining Matches

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now