चॅम्पियन RCB झाली करोडपती, पराभूत पंजाबवरही पैशांचा पाऊस; कोणाला किती मिळाले?

On: June 4, 2025 10:22 AM
RCB Champion Earnings
---Advertisement---

RCB Champion Earnings | 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने अखेर आयपीएल ट्रॉफी जिंकत आपल्या चाहत्यांना आनंदाचा क्षण दिला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी पंजाब किंग्जवर 6 धावांनी विजय मिळवत आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावलं. या ऐतिहासिक विजयासाठी आरसीबीला आणि इतर संघांना मिळालेल्या बक्षीसाची रक्कम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अंतिम सामन्यात विराट कोहलीची शांत खेळी आणि संघाच्या गोलंदाजांनी दाखवलेली चोख कामगिरी यामुळे RCB चं स्वप्न पूर्ण झालं. ज्या क्षणी विजय निश्चित झाला, त्या क्षणी विराट कोहली भावनाविवश झाला, तर पंजाबचा संघ पराभवाच्या छायेत निराश झालेला दिसला. तरीही, या सामन्यात सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला भरघोस बक्षीस मिळालं आहे.

विजेत्या व उपविजेत्याला किती बक्षीस? :

विजेता संघ – RCB (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू): ₹20 कोटी

उपविजेता संघ – पंजाब किंग्ज: ₹13 कोटी

तिसरे स्थान – मुंबई इंडियन्स: ₹7 कोटी

चौथे स्थान – गुजरात टायटन्स: ₹6.5 कोटी

RCB Champion Earnings | वैयक्तिक पुरस्कार व बक्षीस रक्कम:

ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा): साई सुदर्शन (759 धावा) – ₹10 लाख

पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स): प्रसिद्ध कृष्णा (25 विकेट) – ₹10 लाख

इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन: साई सुदर्शन – ₹10 लाख

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर: सूर्यकुमार यादव – ₹15 लाख

सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन: वैभव सूर्यवंशी – Tata Curv EV कार

सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू: निकोलस पूरन – ₹10 लाख

सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा: मोहम्मद सिराज – ₹10 लाख

सर्वोत्कृष्ट कॅच: कामिंदु मेंडिस – ₹10 लाख

सर्वाधिक चौकार: मोहम्मद सिराज – ₹10 लाख

विशेष सन्मान:

फेअर प्ले अवॉर्ड: चेन्नई सुपर किंग्स

पिच आणि ग्राउंड अवॉर्ड: DDCA (दिल्ली) – ₹50 लाख

News Title: IPL 2025 Prize Money Breakdown: RCB Wins ₹20 Crore, Punjab Gets ₹13 Crore Despite Loss

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now