IPL 2025 l इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम (IPL 2025) आजपासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्याआधीच प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांबाबत क्रिकेट तज्ज्ञांनी आपापली भाकितं वर्तवली आहेत. या भाकितांतून सर्वात मोठा धक्का म्हणजे धोनीच्या CSK आणि कोहलीच्या RCB संघाची प्लेऑफ यादीत अनुपस्थिती!
वीरेंद्र सेहवाग, अॅडम गिलख्रिस्ट, मायकेल वॉन, हर्ष भोगले, शॉन पोलॉक यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट तज्ज्ञांनी आपापल्या अंदाजांनुसार IPL 2025 चे टॉप-4 संघ जाहीर केले आहेत. या भाकितांमध्ये सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या तीन संघांचा नामोल्लेख अनेकांनी केला आहे.
वीरेंद्र सेहवागचा धक्कादायक अंदाज :
भारताचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने CSK आणि RCB या दोन दिग्गज संघांना प्लेऑफबाहेर ठेवत मुंबई इंडियन्स (MI), पंजाब किंग्ज (PBKS), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांना प्लेऑफची उमेदवारी दिली आहे. गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी करूनही या संघांना पुनरागमन करताना तो पाहतो आहे.
याशिवाय अॅडम गिलख्रिस्ट, मायकेल वॉन, हर्ष भोगले, शॉन पोलॉक, मनोज तिवारी आणि साइमन डॉल यांनीही आपले-आपले अंदाज सादर केले असून त्यामध्ये अनेकांनी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश केला आहे.
IPL 2025 l तज्ज्ञांचं संपूर्ण प्लेऑफ भाकित :
वीरेंद्र सेहवाग : MI, SRH, PBKS, LSG
अॅडम गिलख्रिस्ट : PBKS, MI, SRH, GT
रोहन गावसकर : RCB, SRH, DC, MI
हर्ष भोगले : SRH, MI, KKR, RCB
शॉन पोलॉक : MI, CSK, SRH, PBKS
मनोज तिवारी : SRH, PBKS, GT, KKR
साइमन डॉल : CSK, KKR, SRH, PBKS
मायकेल वॉन : GT, MI, KKR, PBKS
या यादीवर नजर टाकल्यास SRH, MI आणि PBKS हे तगडे आव्हान ठरू शकणारे संघ असल्याचे स्पष्टपणे दिसते. तर RCB आणि CSK या लोकप्रिय संघांबाबत साशंकता दिसून येते, जी चाहत्यांसाठी निश्चितच आश्चर्यकारक ठरते.






