‘हा’ खेळाडू ठरला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!

On: November 24, 2024 5:10 PM
IPL 2025 Auction
---Advertisement---

IPL 2025 Auction | टीम इंडियाच्या स्फोटक फलंदाजाने इतिहास घडवला आहे. श्रेयस अय्यर (Shreayas Iyer) आयपीएल ऑक्शनच्या (IPL 2025 Auction) इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयसला 25 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे.

सर्वात महागडा खेळाडू

श्रेयसची (Shreayas Iyer) कामगिरी पाहता त्याला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रँचायजींमध्ये चुरस असल्याने 25-25 लाखाने बोली वाढत गेली. श्रेयसची किंमत पाहता पाहता 24 कोटींच्या पार गेली. मात्र त्यानंतरही श्रेयसवर बोली लावली जात होती. त्याला पंजाब किंग्जने 26 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतलं. अय्यर याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सनेही त्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी पंजाबने बाजी मारली.

यशस्वी कर्णधार

KKR ला IPL 2024 चे विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर IPL इतिहासातील लिलावात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. पंजाबने श्रेयसला 26 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केले. श्रेयस अय्यरला (Shreayas Iyer) मिळविण्यासाठी दिल्ली आणि कोलकाता यांच्यात लढत झाली.

या दोघांमध्ये पंजाब किंग्जनेही बोलीत उडी घेतली. यानंतर पंजाब आणि दिल्ली यांच्यात श्रेयस आणि केकेआरला मागे घेण्याची स्पर्धा लागली. श्रेयस लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

श्रेयस अय्यर याने आयपीएल कारकीर्दीत 115 सामने खेळले आहेत. श्रेयसने या 115 सामन्यांमध्ये 127.48 च्या स्ट्राईक रेटने आणि 32.24 सरासरीने 3 हजार 127 धावा केल्या आहेत. तसेच श्रेयसने या दरम्यान 113 षटकार आणि 271 चौकार लगावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

महायुतीतील 6 नेत्यांना मिळणार विधानपरिषदेची संधी, कोणाला लागणार लॉटरी?

निकालानंतर ‘या’ मोठ्या पदावर अजित पवारांची नियुक्ती!

संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; कोणाला किती मिळणार मंत्रिपदं

निकालानंतर EVM विरोधात याचिका कोण दाखल करणार?

जरांगे फॅक्टरचा फायदा कुणाला?, सर्वाधिक मराठा आमदार कोणत्या पक्षाचे आले?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now