India vs Pakistan War | भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाचे गंभीर पडसाद आता प्रतिष्ठित आयपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेवरही उमटले आहेत. गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून (India vs Pakistan War) भारताच्या सीमावर्ती भागांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला आयपीएलचा ५८ वा सामना सुरक्षेच्या कारणास्तव अर्धवट रद्द करावा लागला. धर्मशालाच्या जवळ असलेल्या जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील (Punjab) काही भागांवर झालेल्या हवाई हल्ल्यांच्या धोक्यामुळे हा अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला.
सामना सुरू असताना, पंजाब किंग्जच्या डावातील १०.१ षटके पूर्ण झाली होती आणि संघाने १२२ धावा केल्या होत्या, तेव्हाच हा व्यत्यय आला. मैदानातील प्रेक्षकांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी सुरुवातीला प्रशासनाने खबरदारी घेत फ्लडलाईटमध्ये बिघाड झाल्याचे कारण पुढे करत सामना थांबवण्यात आल्याचे सांगितले. यानंतर, टप्प्याटप्प्याने मैदानातील एकापाठोपाठ एक फ्लडलाईट टॉवर बंद करण्यात आले आणि खेळाडूंसह प्रेक्षकांना तातडीने स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले. उपस्थित बहुतांश प्रेक्षकांना परिस्थितीची कल्पना आल्याने त्यांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करत शांततेत मैदान सोडले. (India vs Pakistan War)
स्टेडियममधील भीतीदायक वातावरणाची तीव्रता :
या घटनेनंतर स्टेडियममधील भीतीदायक वातावरणाची तीव्रता एका चीयरलीडरच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अधिक स्पष्ट झाली. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या या व्हिडिओमध्ये ती चीयरलीडर अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत दिसत असून, तिने घडलेल्या प्रसंगाचे वर्णन केले. तिने सांगितले की, “सामन्यादरम्यान अचानक संपूर्ण स्टेडियम रिकामे करण्यात आले. सर्व काही खूप भीतीदायक होते. प्रत्येकजण ‘बॉम्ब येत आहेत’ असे ओरडत होता. हे सर्व अजूनही खूप भयानक आहे. आम्हाला धर्मशाळातून बाहेर पडायचे आहे. मला आशा आहे की आयपीएलमधील (IPL) संबंधित लोक आमची काळजी घेतील. पण हे खरोखरच खूप भीती वाढवणारे आहे. मला समजत नाहीये की मी रडत आहे, मला वाटते की मला मानसिक धक्का बसला आहे किंवा आणखी काय झाले आहे, हेच कळत नाहीये,” असे उद्गार तिने काढले.
सामना रद्द झाल्यानंतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीमच्या सुरक्षित स्थलांतराची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती विविध माध्यमांमधून समोर आली आहे. वृत्तानुसार, सपोर्ट स्टाफ आणि प्रसारण पथकांना रेल्वेद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. तसेच, खेळाडूंना दिल्ली येथे सुखरूप पोहोचवण्यासाठी उना येथून एका विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे समजते.
आयपीएलसारख्या (IPL) मोठ्या आणि लोकप्रिय स्पर्धेला अशाप्रकारे लष्करी संघर्षाचा फटका बसल्याने क्रीडा विश्वातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे भारत-पाकिस्तानमधील तणावाची गंभीरता आणि त्याचे सर्वसामान्यांच्या जीवनावरील तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांवरील दूरगामी परिणाम अधोरेखित झाले आहेत. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आयपीएल व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे अनेक स्तरातून समर्थन केले जात असले, तरी खेळाडू आणि प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली भीती लक्षणीय आहे.
“Very very scary” – Cheer leader’s SHOCKING video from Punjab Kings Vs Delhi Capitals IPL match in Dharamshala. pic.twitter.com/S830aDKer3
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) May 8, 2025






