दुसऱ्या विजयासाठी पंजाब सज्ज! लखनौ करणार विजयाचा मार्ग खडतर?

On: April 1, 2025 11:15 AM
LSG vs PBKS 2025
---Advertisement---

LSG vs PBKS 2025 l आयपीएल 2025 च्या १३ व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) आमनेसामने येणार आहेत. एकीकडे पंजाब सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे, तर दुसरीकडे लखनौचा संघ आपली विजयी मालिका कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. सामना रंगणार आहे 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता, आणि चाहत्यांचे लक्ष या थरारक लढतीकडे लागले आहे.

सामना कधी आणि कुठे? :

हा सामना भारत रत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे खेळवण्यात येणार आहे. सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर टॉस ७ वाजता पार पडेल.

पंजाब किंग्सने हंगामाची सुरुवात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात प्रभावी कामगिरी करत पंजाबने आत्मविश्वास दाखवला होता. दुसरीकडे, लखनौने पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी दुसऱ्या सामन्यात त्यांनी सनरायजर्स हैदराबादवर 5 गडी राखून विजय मिळवत पुनरागमन केलं.

LSG vs PBKS 2025 l सामना पाहायला कुठे मिळेल? :

या पार्श्वभूमीवर पंजाबला सलग दुसरा विजय मिळवण्याचं उद्दिष्ट असेल, तर लखनौला घरच्या मैदानावर विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये वर चढण्याची संधी साधायची आहे.

हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच मोबाईलवर जिओ सिनेमा अ‍ॅपवर फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध आहे.

जाणून घ्या दोन्ही संघाचे शिलेदार :

लखनौ सुपर जायंट्स संघ:

ऋषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), मिचेल मार्श, अर्शीन कुलकर्णी, निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, शाहबाज अहमद, एडन मार्कराम आदी.

पंजाब किंग्स संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को जॅनसेन आदी.

News Title : IPL 2025: LSG vs PBKS – Will Punjab Clinch Second Win or Will Lucknow Stop Them? Match Time, Venue & Live Streaming

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now