KKR ची चिंता वाढली! प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी करावा लागणार ‘हा’ प्लॅन

On: April 22, 2025 3:00 PM
KKR Playoff
---Advertisement---

KKR Playoff l गेल्या हंगामातील आयपीएल विजेते कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यंदा अपयशाच्या सावटाखाली खेळत असून, त्यांचे प्लेऑफमधील स्थान गंभीर धोक्यात आले आहे. सोमवारी ईडन गार्डन्सवर गुजरात टायटन्सकडून 39 धावांनी पराभव पत्करल्यानंतर केकेआरचा हंगामातील हा पाचवा पराभव ठरला आहे.

केकेआरच्या खात्यात केवळ 6 गुण :

8 सामन्यांनंतर केकेआरच्या खात्यात केवळ 6 गुण असून, संघ सातव्या स्थानावर आहे. पुढील सहा सामन्यांत किमान 5 विजय आवश्यक आहेत, अन्यथा प्लेऑफचं तिकिट गमावण्याचा धोका निश्चितच आहे.

KKR चा पुढील सामना 26 एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे. त्यानंतरचे सामने दिल्ली, राजस्थान, चेन्नई, हैदराबाद आणि RCB या दडपणात खेळणाऱ्या आणि गुणांसाठी लढणाऱ्या संघांविरुद्ध आहेत.

KKR Playoff l प्लेऑफसाठी कोणत्या अटींची गरज? :

सर्व 6 सामने जिंकल्यास = 18 गुण → प्लेऑफ निश्चित

5 सामने जिंकल्यास = 16 गुण → नेट रनरेट महत्त्वाचा ठरेल

4 किंवा त्याहून कमी विजय मिळाल्यास = 14 किंवा कमी गुण → प्लेऑफ कठीण

गेल्या वर्षी काही संघ 14 गुणांवरून प्लेऑफमध्ये पोहोचले होते, पण यंदा स्पर्धा अधिक टोकाची आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे 10 गुण असून त्यांचे अजून 7 सामने शिल्लक आहेत, त्यामुळे ते सहज 16-18 गुण मिळवू शकतात.

गेल्यावर्षीचे विजेते – यंदा डगमगताय? :

शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स यंदाही आघाडीवर असून, त्यांचे 6 सामने बाकी आहेत. केकेआरला जर प्लेऑफमध्ये टिकून राहायचं असेल, तर प्रत्येक सामना अंतिमसारखा खेळावा लागेल. नाहीतर, गतविजेत्यांचं स्वप्न यंदा वेळेतच भंगू शकतं.

News Title: IPL 2025: Is KKR’s Playoff Spot in Danger? 5 Wins Needed in Next 6 Games

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now