IPL 2025 Eliminator | आयपीएल 2025 हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि सर्वांच्या नजरा लागल्या आहेत एलिमिनेटर सामन्यावर. गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन्ही संघांमध्ये हा सामना मुल्लानपूरच्या मैदानावर 30 मे रोजी खेळवला जाणार आहे. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पावसाची शक्यता आहे, आणि यामुळे एलिमिनेटर रद्द (IPL 2025 Eliminator) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोण बाहेर? :
जर पावसामुळे सामना खेळला गेला नाही आणि रद्द करावा लागला, तर आयपीएलच्या नियमानुसार (IPL) गुणतालिकेत वर असलेल्या संघाला पुढच्या टप्प्यात सरसगण्याचा नियम आहे.
या सीझनमध्ये गुजरात टायटन्सने 18 गुण मिळवत गुणतालिकेत मुंबई इंडियन्सपेक्षा (16 गुण) वर स्थान पटकावले आहे. त्यामुळे सामना रद्द झाला, तर गुजरात थेट क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल आणि मुंबई इंडियन्स एलिमिनेटर न खेळताच स्पर्धेबाहेर जाईल. (IPL 2025 Eliminator)
IPL 2025 Eliminator | राखीव दिवस फक्त अंतिम दोन सामन्यांसाठी :
या नियमावर आयपीएल चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण एलिमिनेटरसारख्या महत्त्वाच्या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस (Reserve Day) ठेवलेला नाही. आयपीएल 2025 मध्ये केवळ क्वालिफायर 2 आणि फायनल सामन्यांसाठीच राखीव दिवस आहे. त्यामुळे 5 वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सला या नियमाचा फटका बसू शकतो.
गुजरात टायटन्सने एकदा आयपीएल ट्रॉफी (IPL 2025) जिंकली आहे, तर मुंबई इंडियन्स ही सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवलेली टीम आहे. त्यामुळे, 30 मे रोजी पावसामुळे चाहत्यांना एक हायव्होल्टेज सामना गमवावा लागण्याची शक्यता आहे.






