IPL 2025 | आयपीएल मध्ये (Gujarat Titans) आज गुजरात टायटन्स आणि (Delhi Capitals) दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगलेल्या सामन्याला १९व्या षटकात अनपेक्षित वळण मिळालं, जेव्हा दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तुफान वाद आणि बाचाबाची झाली. ईशांत शर्मा आणि आशुतोष शर्मामध्ये झालेल्या या वादामुळे मैदानावरच तणावाचं वातावरण निर्माण झालं. (IPL 2025)
नेमकं काय घडलं?
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावून २०३ धावा केल्या आणि गुजरातसमोर २०४ धावांचं मोठं आव्हान ठेवलं. पण खरी चर्चा झाली ती १९व्या ओव्हरमधील एका प्रसंगामुळे. गुजरातकडून ईशांत शर्मा गोलंदाजी करत होता. त्याच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने एक बाऊन्सर टाकला, जो थेट (Ashutosh Sharma) आशुतोष शर्माच्या खांद्यावरून (Jos Buttler) विकेटकीपरच्या हातात गेला. त्यावर ईशांतने जोरदार अपिल केलं.
मात्र, आशुतोषने चेंडू खांद्यावर लागला असल्याचा इशारा करत आउट होण्यास नकार दिला. अंपायरनेही अपिल नाकारून ‘लेग बाय’चा इशारा केला. यामुळे ईशांत शर्मा चिडला आणि त्याने थेट आशुतोषवर खोटं बोलण्याचा आरोप करत शब्दांतून वाद घातला. काही क्षणातच दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि इतर खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला.
मैदानावर वातावरण तापलं
या प्रसंगामुळे सामना काही वेळ तणावपूर्ण झाला. अंपायरने दोघांनाही शांत राहण्याचा सल्ला दिला. IPLच्या निती नियमांनुसार मैदानावर खेळाडूंमध्ये असा वाद होणे गंभीर शिस्तभंग मानला जातो. त्यामुळे या घटनेनंतर सामनाधिकारी आणि आयपीएल समितीकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. (IPL 2025)
GT vs DC प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स: अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकिपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार
गुजरात टायटन्स: साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकिपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, ईशांत शर्मा
Title : IPL 2025 GT vs DC Fight Heated On-Field Clash






