गुजरात टायटन्सला मोठा धक्का, स्टार खेळाडूने अचानक सोडली टीमची साथ

On: April 12, 2025 2:04 PM
IPL 2025 Glenn Phillips Leaves Gujarat Titans  
---Advertisement---

IPL 2025 |आयपीएल 2025 हंगामात आतापर्यंत 25 सामने पार पडले आहेत. या दरम्यान गुजरात टायटन्स टीमला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन फिलिप्सने अचानक टीमची साथ सोडली असून तो मायदेशी परतला आहे. टीमचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध असताना ही बातमी समोर आली आहे, ज्यामुळे संघावर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. (IPL 2025 )

फिलिप्सला मेगा ऑक्शनमध्ये कोट्यवधी रुपयांना विकत घेतलं गेलं होतं, मात्र त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. 6 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध फिल्डिंग करताना झालेल्या दुखापतीनंतर तो मैदानात दिसला नव्हता. त्यामुळे त्याच्या माघारीमागचं प्रमुख कारण ही दुखापतच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दुखापतीमुळे मैदानाबाहेर, टीमच्या सरावातही अनुपस्थित

सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्स सब्स्टिट्यूट फील्डर म्हणून उतरला होता. मात्र एका थ्रो दरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्याला सहकारी खेळाडूंच्या मदतीने मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर तो कोणत्याही प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेला नव्हता.

त्याच्या दुखापतीबाबत BCCI किंवा फ्रँचायझीकडून अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिलिप्स सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. त्यामुळे गुजरातसाठी ही बाब काळजीची बनली आहे.

परदेशी खेळाडूंच्या संख्येत घट, चिंता वाढली

ग्लेन फिलिप्स व्यतिरिक्त कगिसो रबाडासुद्धा दक्षिण आफ्रिकेला परतला असून तो पुन्हा टीममध्ये कधी सामील होणार, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सकडे आता फक्त पाच परदेशी खेळाडू उरले आहेत – जोस बटलर, शेरफेन रदरफोर्ड, राशिद खान, गेराल्ड कोएट्जी आणि करीम जनत.

गुजरात टायटन्स सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 5 सामन्यांमध्ये 4  विजय मिळवले आहेत. मात्र, आगामी सामन्यांमध्ये परदेशी खेळाडूंचा अपुरा सपोर्ट संघासाठी अडचण ठरू शकतो.

English Title: IPL 2025 Glenn Phillips Leaves Gujarat Titans  

 

 

Join WhatsApp Group

Join Now