IPL 2025 | आयपीएल 2025 च्या हंगामात आधीच अडचणीत असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघात नुकताच सामील झालेला खेळाडू कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) याच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे, ज्यामुळे संघाच्या कामगिरीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कॉर्बिन बॉशवर बंदी
IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा फॉर्म खालावलेला असून पाच पैकी केवळ एक सामना जिंकण्यात संघाला यश आले आहे. अशा परिस्थितीत, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश, जो (Lizaad Williams) लिझाड विल्यम्सच्या जागी संघात दाखल झाला होता, त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. कॉर्बिन बॉशने (Pakistan Super League) पाकिस्तान सुपर लीगच्या 10 व्या हंगामातून माघार घेतल्यानंतर त्याच्यावर ही बंदी लागू करण्यात आली आहे.
कॉर्बिनने पीएसएलमधील (Peshawar Zalmi) पेशावर झल्मी संघातून माघार घेतल्याने आयोजकांकडून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. IPL साठी त्याच्या निवडीमुळे त्याने पीएसएलमधील कर्तव्यातून स्वत:ला बाजूला घेतलं, यामुळे त्याच्यावर आर्थिक दंडासह एक वर्षाच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना मुंबई इंडियन्ससाठी मोठी अडचण ठरणार आहे.
पीएसएलमधून माघार घेतल्यामुळेच बंदी?
कॉर्बिन बॉशने पीएसएलमधून माघार घेतल्यामुळे झालेल्या परिणामांबद्दल खेद व्यक्त केला आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले की, “पीएसएलमधून बाहेर पडण्याच्या माझ्या निर्णयामुळे मला वाईट वाटते आहे. मी पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमी, पेशावर झल्मीचे चाहते आणि संपूर्ण क्रिकेट समुदायाची मनापासून माफी मागतो.” त्याने पीएसएलला एक प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून संबोधले आणि आपल्या कृतीमुळे झालेल्या नाराजगीची त्याला पूर्ण जाणीव असल्याचंही नमूद केलं.
बंदी आणि दंड स्वीकारताना बॉशने हेही स्पष्ट केलं की तो या अनुभवातून शिकण्यास तयार आहे. “मी माझ्या वर्तनाची जबाबदारी स्वीकारतो आणि या शिक्षेमुळे मला कठोर धडा मिळाला आहे. भविष्यात पीएसएलमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी मी स्वतःला अधिक समर्पित ठेवेन आणि चाहत्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करीन,” असे त्याने पुढे सांगितले.
English Title : IPL 2025 Corbin Bosch Banned for One Year from PSL






