चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! एमएस धोनीचे चाहते हैराण

On: October 2, 2024 4:49 PM
MS Dhoni
---Advertisement---

Retention Rule l सध्या सर्वत्र आयपीएलची चर्चा सुरु आहे. अशातच बीसीसीआयने देखील आयपीएल 2025 साठी रिटेंशन नियमांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजींना येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसीलकडे द्यावा लागणार आहे. परंतु बीसीसीआयचा एक नियम चेन्नई सुपर किंग्ससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बीसीसीआयचा नियम धोनीला लागू होणार :

बीसीसीआयच्या नियमानुसार, जर एखादा खेळाडू गेल्या पाच वर्षात भारतासाठी एक सुद्धा सामना खेळला नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून मानलं जाणार आहे. अशातच त्या खेळाडूची किंमत देखील कमी होईल आणि फ्रँचाईजच्या पैशात देखील बचत होऊ शकते. मात्र आता हा नियम चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लागू होऊ शकतो.

कारण महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच धोनीने जुलै 2019 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यामुळे बीसीसीआयचा नियम हा लागू होणार आहे.

Retention Rule l चेन्नई सुपर किंग्सच्या सीईओने केलं मोठं वक्तव्य :

बीसीसीआयच्या या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्स अवघ्या 4 कोटी रुपयात महेंद्रसिंग धोनीला आपल्या संघात घेण्याची शक्यता आहे. तसेच धोनी आयपीएलमध्ये फक्त पुढचा आणखी एक हंगाम खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता स्वत: धोनीला वाटत आहे की, संघाने आपल्यावर जास्त पैसे खर्च करू नये. पण एक मात्र नक्की की हा नियम लागू झाल्याने धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळण्याची दाट शक्यता वाढली आहे.

यासंदर्भात चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी एक वक्तव्य केलं आहे. चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, ‘या नियमाचा वापर महेंद्रसिंग धोनीसाठी करण्याबाबत विचार केला नाही. कारण यासंदर्भात जास्त बोलणं खूप घाईचं होईल, तसेच आम्ही धोनीबरोबर यासंदर्भात अद्याप चर्चा देखील केलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात धोनीबरोबर आम्ही चर्चा होकरणार आहोत. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.

News Title – IPL 2025 Chennai Super Kings

महत्वाच्या बातम्या-

‘या’ आजाराने वाढवलंय नागरिकांचं टेन्शन! अशी घ्या स्वतःची काळजी

बिग बॉसकडून सूरज चव्हाणवर अन्याय; आता थेट…

अभिनेता गोविंदाच्या हेल्थबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर!

दिवाळी गिफ्ट! फक्त 13 हजार रुपये भरा आणि iPhone 16 मिळवा

यादी तयार! रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 मोठे नेते पाडणार; कोणी दिला इशारा?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now