आयफोन 17 साठी नागरिकांमध्ये मारामारी! BKC मध्ये ग्राहकांचा प्रचंड राडा, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

On: September 19, 2025 11:07 AM
Iphone 17 Pro Max Employees Gift |
---Advertisement---

iPhone 17 | मुंबईच्या BKC जिओ सेंटरमधील ॲपल स्टोअरबाहेर iPhone 17 खरेदीसाठी झालेल्या गर्दीत आज गोंधळ उडाला. पहाटेपासून ग्राहकांची प्रचंड रांग लागली होती. परंतु नवीन फोन हातात लवकर मिळावा, यासाठी झालेल्या धक्काबुक्कीतून बाचाबाची आणि मारहाणीची वेळ आली.

परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून सुरक्षारक्षकांना तत्काळ हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी लोकांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारामुळे आयफोनसाठी असलेल्या प्रचंड क्रेझसोबतच त्यातून निर्माण होणारा ताणदेखील समोर आला.

कॉस्मिक ऑरेंजची धडाकेबाज मागणी :

ॲपलचा iPhone 17 Pro Max ‘Cosmic Orange’ रंगाचा मॉडेल या गोंधळामागे मोठं कारण ठरला आहे. लाँच होताच या रंगाचा फोन भारतासह अमेरिकेत अवघ्या तीन दिवसांतच स्टॉक आऊट झाला. भारतातील अधिकृत ॲपल स्टोअरमध्येही सध्या हा रंग इन-स्टोअर पिकअपसाठी उपलब्ध नाही.

तज्ज्ञांच्या मते, हा रंग iPhone 17 सीरिजमध्ये पहिल्यांदाच आणण्यात आला असून, त्याचा प्रीमियम मॅट फिनिश आणि युनिक लूक ग्राहकांना भुरळ घालत आहे. वाढत्या मागणीमुळे ॲपल कंपनी लवकरच याचा नवीन स्टॉक आणण्याच्या तयारीत आहे.

iPhone 17 | देशभरातील उत्साह :

मुंबईपुरतं मर्यादित न राहता, पुणे, दिल्लीसह देशातील प्रमुख ॲपल स्टोअर्सबाहेरही आजपासून ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

तसेच अनेकांनी तर रात्रीपासूनच ठाण मांडून ठेवत पहिल्या क्रमांकावर आयफोन खरेदी करण्याचा आनंद घेतला.

News Title: iPhone 17 Chaos in Mumbai: Customers Clash in BKC Queue, Cosmic Orange Model Sold Out

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now