iPhone 16 series l गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन 16 सिरिजची संपूर्ण जग मोठ्या उत्सुकतनेने वाट पाहात होते. मात्र आज अॅपल कंपनी आयफोन 16 सिरीज लाँच करणार आहे. Apple कंपनीचा iPhone 16 लाँच इव्हेंट हा भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील Apple Cupertino पार्क येथे होणार आहे. (iphone 16 launch)
iPhone 16 सिरिजची किंमत किती असणार? :
मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 16 सीरीजमध्ये चार मॉडेल्स असणार आहेत. iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max. iPhone 16 सिरीज ही iOS18 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे. तसेच या सिरीजमधील दोन मॉडेल्स, iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये A18 चिपसेट असणार आहे. याशिवाय iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये A18 Pro चिपसेट असेल.
मात्र आता सर्वाना प्रश्न पडला असेल की, आयफोन 16 सिरिजची (apple iphone 16) किंमत किती असणार? तर आयफोन 16 ची अंदाजे किंमत ही 66300 रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. याशिवाय आयफोन 16 पल्स या स्मार्टफोनची किंमत 74 हजार 600 रुपयांपासून सुरु होऊ शकते. तर आयफोन 16 प्रो या स्मार्टफोनची किंमत साधारण 91 हजार 200 रुपयांपासून सुरु होऊ शकते. तसेच आयफोन 16 प्रो मॅक्स हे मॉडेल साधारण 99 हजार 500 रुपयांना मिळू शकते. (apple iphone 16 launch)
iPhone 16 series l कॅमेरा फीचर्स काय असणार? :
सर्वात महत्वाचं म्हणजे येत्या 20 सप्टेंबरपासून आयफोन 16 सिरीज भारतात विक्रीसाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. तसेच यावेळी आयफोन 16 च्या डिझाइनमध्ये बरेच बदल असू शकतात. या सीरिजमध्ये नवीन व्हर्टिकल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये 48-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड अँगल लेन्स असण्याची शक्यता आहे. (apple iphone 16 launch event)
आयफोन 16 प्रो मॉडेल्समध्ये, वापरकर्ते फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी एक बटण दिले जाऊ शकते. तसेच, दोन्ही मॉडेल्समध्ये Tetra Prism 5x optical zoom लेन्स असू शकतात.
News Title – iPhone 16 series Launched
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांसाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार
‘या’ आयुर्वेदिक चहाचे फायदे ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या बनवण्याची पद्धत
मनोज जरांगेंच्या विरोधात ‘या’ मराठा नेत्याचे आंदोलन, विचारली या प्रश्नांची उत्तरे
“सोनाक्षी सिन्हाला धरावा लागणार रोजा?”; ‘ते’ फोटो शेअर करताच भडकले नेटकरी
शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; पुण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?






