आयफोन 16 ‘या’ देशात मिळणार सर्वात स्वस्त!

On: September 7, 2024 1:47 PM
iPhone 16 series
---Advertisement---

iPhone 16 l जेव्हा जेव्हा ॲपलचा फोन लाँच होतो तेव्हा तो टेक इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा सर्वात मोठा विषय बनतो. यावेळी Apple कंपनी iPhone 16 सिरीज 9 सप्टेंबर 2024 रोजी लाँच करणार आहे. आता या फोनच्या लाँचिंगला काही दिवस उरले आहेत, मात्र या फोनची किंमत जाणून घेण्यासाठी लोक आधीच उत्सुक आहेत.

iPhone 16 कोणत्या देशात स्वस्त असेल? :

iPhones खूप महाग आहेत, म्हणून लोकांना हे देखील जाणून घ्यायचे आहे की कोणत्या देशात iPhone 16 सर्वात स्वस्त मिळत आहे. आयफोन 16 लाँच झाल्यानंतर सर्वात कमी किमतीत कोणत्या देशात विकला जाईल. तर आज आपण जाणून घेऊयात आयफोन 16 ची किंमती वेगवेगळ्या देशांमध्ये किती आहेत.

आयफोनची किंमत जपानमध्ये सर्वात कमी आहे. जपानमध्ये कमी कर आणि इतर शुल्कांमुळे आयफोन 16 ची किंमत अमेरिकेपेक्षा 17.9% कमी असू शकते. जपानमध्ये iPhone 16 ची किंमत अंदाजे 70,705 रुपये असू शकते, जी इतर देशांच्या तुलनेत खूपच परवडणारी असेल.

iPhone 16 l भारतात किंमत काय असेल? :

यानंतर आयफोन 16 अमेरिकेतही खूप स्वस्त असू शकतो. आपल्या देशांतर्गत बाजारातही Apple सर्वात कमी किमतीत iPhone 16 विकू शकते. आयफोन 16 हा फोन USA मध्ये सुमारे 67,106 रुपयांना विकला जाऊ शकतो. असे झाल्यास आयफोन 16 अमेरिकेत जपानपेक्षा स्वस्त होईल.

iPhone 16 खरेदी करण्याचा तिसरा स्वस्त पर्याय दुबई असू शकतो, जिथे त्याची किंमत सुमारे 73,237 रुपये असू शकते. तर भारतात iPhone 16 ची किंमत जवळपास 80,000 रुपये असू शकते. भारतानंतर चीनमध्ये या फोनची किंमत जवळपास 82,560 रुपये असण्याची शक्यता आहे.

News Title : iPhone 16 Price In India

महत्वाच्या बातम्या-

घरी गणपती बाप्पाची स्थापना करत असाल तर ‘या’ वस्तू घरात चुकूनही आणू नका!

गणेशोत्सवाला गालबोट! मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना BMW कारने चिरडलं

पुण्यातील ‘या’ भागात 10 दिवस दारू बंदी!…तर असं केल्यास कारवाई होणार

पावसाच्या सरींनी होणार गणरायाचं स्वागत; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

बाप्पाचे आगमन होताच सोने-चांदीचे दर कडाडले; जाणून घ्या आजचे दर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now