फक्त ५,००० रुपयांची गुंतवणूक करून मिळवा तब्बल ८.५ लाख रुपये! पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

On: September 29, 2025 6:10 PM
Post Office Scheme
---Advertisement---

Post Office Scheme | आजच्या काळात प्रत्येकालाच आपले भविष्य सुरक्षित करायचे असते. मुलांचे शिक्षण, घरखर्च, निवृत्तीनंतरचा खर्च अशा अनेक गोष्टींसाठी आपण नियमित बचत करणे गरजेचे असते. पण अनेकदा पगारातून थेट मोठी गुंतवणूक करणे शक्य होत नाही. अशा वेळी थोड्या-थोड्या रकमेची बचत करून मोठा फंड उभारणे हा उत्तम पर्याय ठरतो. पोस्ट ऑफिसच्या (Post Office) बचत योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी हाच मार्ग उपलब्ध करून देतात.

यामधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) योजना.

या योजनेची वैशिष्ट्ये :

– फक्त ₹100 पासून सुरू करता येते.
– पूर्णतः सुरक्षित योजना (पोस्ट ऑफिसकडून हमी).
– दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते.
– मुदत संपल्यानंतर मूळ रक्कम आणि आकर्षक व्याज (Interest) दोन्ही मिळते.
– अल्पबचतीतून मोठा फंड उभारण्यासाठी अत्यंत उपयुक्त. (Post Office Scheme)

5 वर्षांसाठी गुंतवणूक :

एकूण गुंतवणूक : ₹3,00,000
व्याज : ₹56,830
5 वर्षानंतर मिळणारी रक्कम : ₹3,56,830

10 वर्षांसाठी गुंतवणूक :

एकूण गुंतवणूक : ₹6,00000,
व्याज : ₹2,54,272
10 वर्षानंतर मिळणारी रक्कम: ₹8,54,272

ही योजना का फायदेशीर आहे ?

– कमी उत्पन्न असणाऱ्यांनाही सहज गुंतवणूक करता येते.
– दर महिन्याला फक्त 5000 रुपये बाजूला काढून ठेवले, तरी 10 वर्षांत 8.5 लाख रुपयांचा फंड तयार होतो.
– बचत करतानाच व्याजाचा अतिरिक्त फायदा. (Post Office Scheme)
– सुरक्षित गुंतवणूक असल्याने जोखमीची चिंता नाही.

दर महिन्याला थोडी थोडी बचत करून तुम्ही भविष्यासाठी मोठा फंड तयार करू शकता. ही योजना खास करून मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी अतिशय उपयुक्त आहे.

News Title :- Invest Just ₹5,000 and Get a Whopping ₹8.5 Lakh! Post Office’s Fantastic Scheme

Join WhatsApp Group

Join Now