PPF Scheme | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund – PPF) ही केंद्र सरकारची सुरक्षित आणि दीर्घकालीन बचत योजना आहे. पोस्ट ऑफिस आणि बँक दोन्हीकडे ही योजना उपलब्ध आहे. या योजनेत सध्या वार्षिक व्याजदर 7.1 टक्के आहे.
PPF खाते 15 वर्षांत होते मॅच्युअर :
पीपीएफ खाते 15 वर्षांसाठी उघडले जाते. मात्र, तुम्ही अर्ज करून त्याची मुदत प्रत्येक वेळी 5 वर्षांनी वाढवू शकता.
किमान वार्षिक ठेव: ₹500
कमाल वार्षिक ठेव: ₹1.5 लाख
तुम्ही एकरकमी किंवा 12 हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता.
जर तुम्ही दरमहा ₹5,000 म्हणजेच दरवर्षी ₹60,000 या योजनेत गुंतवणूक केली, तर 15 वर्षांत एकूण ₹9 लाखांची गुंतवणूक होईल. या रकमेवर ₹7,27,284 व्याज मिळून एकूण ₹16,27,284 रुपये मॅच्युरिटीच्या वेळी मिळतील.
PPF Scheme | पीपीएफ खाते का फायदेशीर आहे? :
– पूर्णपणे सरकारी हमी असलेली योजना, त्यामुळे धोका नाही.
– कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे.
– खाते बंद झाल्यास दंड भरून पुन्हा सुरू करता येते.
पहिल्या 5 वर्षांपूर्वी पैसे काढता येत नाहीत, परंतु आरोग्य उपचार किंवा शिक्षणासाठी काही प्रमाणात पैसे काढता येतात. तसेच पीपीएफ खाते उघडताना सर्व कागदपत्रे योग्यरीत्या भरणे आवश्यक आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.






