Indian Railway | गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार, अशा जोरदार चर्चा रंगत आहेत. मोदी सरकार रेल्वेचे खासगीकरण करणार, याबाबत बोललं जातंय. विरोधी गटाकडूनही याबाबत अनेकदा आरोप करण्यात आले आहेत. अशात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आज 4 ऑक्टोबररोजी ते नाशिक दौऱ्यावर आले आहेत. (Indian Railway ) यावेळी बोलताना त्यांनी या चर्चेबाबत मोठं भाष्य केलं.
“रेल्वेचे खासगीकरण होणार, असा एक भ्रम तयार केला जात आहे. पण, असं काहीही होणार नाहीये.”, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधत त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाले रेल्वेमंत्री?
“राजकारणात कधीच रेल्वे आणि संरक्षण हा विषय यायला नको. रेल्वेचे खासगीकरण होणार, असं सांगितलं जातंय. पण, असा निर्णय कधीच होणार नाही. याबाबत मी संसदेत देखील स्पष्ट केलंय. देशात 12.50 हजार कोटींचे जनरल कोच करण्याचे काम सुरू आहे”, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. (Indian Railway )
तसेच, पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेमध्ये अनेक परिवर्तन केले आहेत. देशात वंदे भारत, वंदे मेट्रोसारख्या नवीन ट्रेन आल्या आहेत. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे.जवानांना बुलेप्रुफ जॅकेट आणि इतर सुविधा या मागण्या ही नक्की पूर्ण होणार आहे. आरपीएफच्या आणि इतर सुविधांसाठी 35 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकारने रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाईतके बोनस जाहीर केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगारापेक्षा अधिक रक्कम थेट बोनस म्हणून मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली आहे. (Indian Railway )
केंद्राने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा एकूण 11.72 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने या बोनसला प्रोडक्टिव्हीटी लिंक्ड रिवॉर्ड असं म्हटलं आहे. यासाठी एकूण 2029 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
News Title – Indian Railways will not be privatized says Ashwini Vaishnav
महत्त्वाच्या बातम्या-
प्रतिक्षा संपली!’बिग बॉस 18′ मध्ये दिसणार ‘हे’ सेलेब्रिटी, पाहा यादी
‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस’ मराठी 5 चा विजेता?
सोनं खरेदी करावं की नाही?, दरवाढीचं सत्र सुरूच; जाणून घ्या आजचे दर
दिवाळी गिफ्ट! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, जाणून घ्या याचे काय फायदे मिळणार!






