1 जुलैपासून रेल्वे तिकीट दरात वाढ; जाणून घ्या किती वाढलं भाडं

On: July 1, 2025 3:57 PM
Railway Recruitment 2025
---Advertisement---

Indian Railways | भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. 1 जुलैपासून देशभरात मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जरी प्रती किलोमीटर फारशी मोठी वाटत नसली, तरी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर त्याचा सरळ आर्थिक परिणाम होणार आहे. (Indian Railways)

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, या भाडेवाढीचा लोकल प्रवाशांवर किंवा मासिक पासधारकांवर परिणाम होणार नाही. फक्त मेल/एक्सप्रेस आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

भाडेवाढ कशी आणि कुणासाठी? :

500 किमीपेक्षा अधिक प्रवास करणाऱ्यांसाठी:

– सामान्य दुसरी श्रेणी: प्रति किलोमीटर 0.50 पैसे वाढ
– मेल/एक्सप्रेस नॉन-एसी: प्रति किलोमीटर 1 पैसा वाढ
– एसी क्लास (स्लीपर, 3-टायर, चेअर कार): प्रति किलोमीटर 2 पैसे वाढ

500 किमीपर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी:

– सामान्य दुसऱ्या श्रेणीचे दर यथास्थित राहणार

लोकल ट्रेन प्रवासी आणि मासिक पासधारकांसाठी:

– कोणतीही वाढ नाही, दर कायम राहणार

Indian Railways | उदाहरणार्थ – किती जास्त मोजावे लागेल? :

जर तुम्ही 1,000 किलोमीटर प्रवास करत असाल, आणि नॉन-एसी मेल/एक्सप्रेस गाडीने जात असाल, तर तुम्हाला 10 रुपये जास्त मोजावे लागतील. तसेच एसी प्रवासासाठी तेच अंतर असेल तर 20 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. (Indian Railways)

रेल्वेचं स्पष्टीकरण काय? :

रेल्वे प्रशासनानं सांगितलं की, ही भाडेवाढ इंधन, देखभाल खर्च आणि ऑपरेशनल कॉस्ट वाढल्यामुळे करण्यात आली आहे. ही वाढ अत्यंत किरकोळ असून, प्रवाशांच्या खिशावर फारसा भार पडणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

News Title: Indian Railways Fare Hike from July 1: Long-Distance Travel Gets Costlier – Check Revised Ticket Rates

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now