पाकिस्तानला भारताचा दणका! भारतीय सैन्याच्या शौर्याचा हा VIDEO पाहून अभिमान वाटेल

On: May 9, 2025 9:20 AM
Indian Army Video
---Advertisement---

Indian Army Video | भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) अंतर्गत पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर केलेल्या वारंवार युद्धबंदी उल्लंघनानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने सोशल मीडियावर पाकिस्तानचा ड्रोन पाडल्याचा थरारक व्हिडिओ शेअर केला असून, तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठा धक्का :

8 आणि 9 मेच्या रात्री पाकिस्तानने ड्रोन (Pakistan Drones) आणि इतर शस्त्रांद्वारे भारताच्या पश्चिम सीमेवर हल्ला चढवला. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरही अनेक वेळा गोळीबार करण्यात आला. मात्र भारतीय लष्कराने या सर्व हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या नापाक कारवायांना अपयश दिलं. लष्कराने स्पष्ट केलं की, देशाच्या सार्वभौमत्वासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

केवळ लष्कर नव्हे, तर भारतीय नौदलानेही समुद्रमार्गाने पाकिस्तानवर घणाघात केला आहे. INS विक्रांतच्या मदतीने कराची बंदरावर हवाई हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात कराची बंदर उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. अरबी समुद्रात तैनात INS विक्रांतने पाकिस्तानच्या सामरिक क्षमतेला मोठा धक्का दिला आहे.

Indian Army Video | दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई :

22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतलं आणि पाकिस्तान व पीओकेमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

यानंतर पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सर्व ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि विमानं नष्ट केली आहेत.

News Title : Indian Army Destroys Pakistani Drone: Watch Video of Operation Sindoor Response

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now