भारत-पाकिस्तान सामना रद्द! पाकिस्तान संघ भारतात येणार नाही; नेमकं कारण काय?

On: August 7, 2025 3:59 PM
India vs Pakistan
---Advertisement---

India vs Pakistan | आगामी 2025 आशिया चषक हॉकी स्पर्धेतील भारत-पाकिस्तानचा सामना रद्द होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. पाकिस्तानच्या हॉकी संघाने भारतात येऊन सामना खेळण्यास स्पष्ट नकार दिला असून, त्यामुळे या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील बहुचर्चित सामना रद्द होणार आहे. (India vs Pakistan)

पाकिस्तानचा नकार, भारताकडून बांगलादेशला आमंत्रण :

27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीत बिहारमधील राजगीर येथे आशिया चषक हॉकी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तानसह 8 देश सहभागी होणार होते. मात्र, पाकिस्तान हॉकी महासंघाने सुरक्षा कारणांचा हवाला देत भारतात येण्यास नकार दिला आहे.

भारत सरकारने पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा देण्याची तयारी दाखवली होती, तरीही पाकिस्तानकडून स्पर्धेतून माघार घेण्यात आली. यानंतर भारताकडून बांगलादेश संघाला पर्यायी सहभागासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. (India vs Pakistan)

India vs Pakistan | पहलगाम हल्ल्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावर :

गेल्या काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात तणाव वाढला आहे. याचा परिपाक आता क्रीडा क्षेत्रावरही दिसून येतोय. क्रिकेटप्रमाणेच हॉकीमधील सामनेही तटस्थ देशांमध्ये हलवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आशिया कप 2025 मध्ये सहभागी संघ :

भारत
चीन
जपान
मलेशिया
दक्षिण कोरिया
ओमान
चिनी तैपेई
(पाकिस्तान माघार घेतल्याने) बांगलादेश (संभाव्य प्रवेश)

या स्पर्धेतील विजेता संघ 2026 मध्ये नेदरलँड आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर अव्वल 5 संघ पुढील पात्रता फेरीतही सहभागी होतील.

News Title: India vs Pakistan Hockey Match Cancelled in Asia Cup 2025; Pakistan Team Refuses to Travel to India

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now