IND vs ENG | क्रिकेटप्रेमींनो, आनंदाची बातमी आहे. 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिकेला सुरुवात होत आहे. हा थरार इंग्लंडच्या मैदानावर खेळवला जाणार असून, भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा यावेळी युवा फलंदाज शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याची संधी तुम्हाला फुकटात मिळणार आहे. (India vs England Free Live Streaming)
कुठे आणि कसा पाहाल मोफत सामना? :
जर तुम्ही टीव्हीवर सामना पाहू इच्छित असाल, तर Sony Sports चे विविध चॅनेल्स सामना थेट दाखवतील. मात्र हे पाहण्यासाठी तुमच्याकडे त्यांचे सबस्क्रिप्शन असणे गरजेचे आहे.
मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहण्यासाठी तुम्ही जिओ हॉटस्टार अॅपचा वापर करू शकता. जर तुमच्याकडे जिओचे सबस्क्रिप्शन असेल, तर सामना तुम्हाला मोफत पाहता येईल. (India vs England Free Live Streaming)
मोफत सामना पाहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे DD Sports चॅनेल. या चॅनेलवर भारत-इंग्लंड मालिकेतील सर्व कसोटी सामने मोफत दाखवले जाणार आहेत, मात्र यासाठी Free Dish कनेक्शन असणे आवश्यक आहे.
जर तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही आहे, तर तिथे DD Sports सहज उपलब्ध असतो. जर Free Dish कनेक्शन नसेल, तर या मोफत सेवेसाठी तो आवश्यक आहे.
IND vs ENG | शुभमन गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी :
या मालिकेतील विशेष बाब म्हणजे, टीम इंडियाचं नेतृत्व आता युवा शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेसाठी अनुपस्थित असतील, त्यामुळे गिलसाठी ही एक मोठी संधी आहे. फलंदाज म्हणून सातत्य दाखवलेला गिल कर्णधार म्हणून कितपत यशस्वी ठरतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(India vs England)
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
पहिली कसोटी: 20-24 जून
दुसरी कसोटी: 28 जून – 2 जुलै
तिसरी कसोटी: 6 – 10 जुलै
चौथी कसोटी: 18 – 22 जुलै
पाचवी कसोटी: 30 जुलै – 3 ऑगस्ट
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होतील.)






