Mobile Voting | मतदान प्रक्रियेत ऐतिहासिक बदल होत असून, आता मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाण्याची गरज राहणार नाही. कारण, बिहारमध्ये (Bihar Mobile Voting) प्रथमच मोबाईल अॅपद्वारे मतदान सुरू करण्यात आलं आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला आणि स्थलांतरित मतदारांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.
बिहार राज्य निवडणूक आयोगाने ‘E-SECBHR’ नावाचे अॅप विकसित केले असून, याचे प्रायोगिक वापर पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या जिल्ह्यांतील ६ नगरपरिषदांमध्ये करण्यात आला. हा अॅप फिलहाल फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध असून, ते केवळ पात्र व नोंदणीकृत मतदारांद्वारे वापरण्याची परवानगी आहे.
कसे करायचे मोबाईल अॅपद्वारे मतदान? :
– मतदारांनी सर्वप्रथम Play Store वरून E-SECBHR अॅप डाउनलोड करावे. त्यानंतर खालील टप्पे पार करावे लागतात:
– नाव, मतदार आयडी क्रमांक, वय, पत्ता अशी प्राथमिक माहिती भरावी.
– मोबाईलवर आलेला OTP टाकून खात्री करावी.
– सेल्फी अपलोड करावी, जी लाईव्हनेस डिटेक्शन तंत्रज्ञानाद्वारे तपासली जाते.
– मतदार ओळखपत्र स्कॅन करून माहितीची पडताळणी होते.
– अॅपवर लॉग इन करून ‘Vote Now’ बटणावर क्लिक करावे आणि निवडलेल्या उमेदवारास मत द्यावे.
‘- Confirm Vote’ क्लिक करून मत नोंदवले जाते.
ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होते आणि ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड व ब्लॉकचेनवर आधारित असल्यामुळे अतिशय सुरक्षित मानली जाते.
Mobile Voting | मतदान सुरक्षित आणि गुप्तच राहते का? :
निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की, ई-मतदान प्रक्रिया पूर्णपणे गुप्त व सुरक्षित आहे. एका मोबाईल नंबरवर फक्त दोन मतदार नोंदणी करू शकतात. प्रत्येक मतदाराची ओळख पडताळणी मतदार ओळखपत्र, OTP आणि लाईव्ह फोटो मॅचिंगद्वारे केली जाते. (Mobile Voting)
सद्यस्थितीत १०,००० मतदारांनी ई-मतदानासाठी नोंदणी केली असून, ५०,०००हून अधिक मतदार येत्या निवडणुकीत ऑनलाईन पद्धतीने मतदान करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भविष्यात देशभरात ई-मतदानाची प्रणाली आणखी विस्तारली जाण्याची शक्यता आहे.






