IND vs PAK | आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीत भारत-पाकिस्तान सामना नेहमीप्रमाणे तुफानी ठरला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केवळ चौकार-षटकारच नव्हे, तर शाब्दिक सामना देखील रंगला. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि पाकिस्तानचा (Pak) वेगवान गोलंदाज हरीस रऊफ (Haris Rauf) भर मैदानात भिडले आणि काही वेळ खेळ थांबवावा लागला.
सामन्यातील तुफानी सुरुवात :
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात भारताने शुबमन गिल (Shubhman Gill) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) या सलामी जोडीने जबरदस्त सुरुवात दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये शाहिन आफ्रिदीला अभिषेकने सहा मारत सामन्याचा सूर लावला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा तर तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा 12 धावा काढत भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. (Abhishek Sharma Haris Rauf Fight)
भारताच्या डावातील पाचव्या ओव्हरमध्ये हरीस रऊफ (Haris Rauf) गोलंदाजीसाठी आला. त्याच्या ओव्हरमध्ये भारतीय जोडीने 12 धावा चोपल्या. याच दरम्यान रऊफ आणि अभिषेक यांच्यात वाद झाला. शिवीगाळ आणि गरमागरमी इतकी वाढली की दोघेही आमनेसामने आले. पंचांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
gill and abhishek shown aukat to this porki haris rauf#INDvPAK #AsiaCup pic.twitter.com/0QByqZnNE0
— SouLKirmada (@BabluuuuOp) September 21, 2025
अभिषेकची वादळी खेळी :
वादानंतरही अभिषेक शर्मा याने खेळावर लक्ष केंद्रित ठेवत तुफानी अर्धशतक झळकावले. फक्त 24 चेंडूत त्याने 50 धावा पूर्ण केल्या. त्याच्यासह शुबमन गिलने 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या जोडीने 105 धावांची शतकी भागीदारी रचून भारताला मजबूत पाया दिला. मात्र अखेरीस पाकिस्तानने गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला.
दरम्यान, IND vs PAK सामन्यात चौकार-षटकारांच्या बरसातीसोबतच अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि हरीस रऊफ यांच्यातील हा शाब्दिक सामना रंगला. सोशल मीडियावर “अभिषेक विरुद्ध रऊफ” हा क्लिप चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. (Abhishek Sharma Haris Rauf Fight)






