मोठी बातमी! बिहारमध्ये जागावाटपावरून भाजपचे मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत; NDA मध्ये फूट पडणार?

On: October 8, 2025 6:59 PM
Bihar Election 2025
---Advertisement---

Bihar Election 2025 | बिहारमध्ये निवडणुकीचं वातावरण आता जोरात रंगतंय. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, राज्यभरात सगळ्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे — पहिला टप्पा 6 नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला. तर मतमोजणी 14 नोव्हेंबरला होईल.

NDA मध्ये जागावाटपावरून मोठा गोंधळ :

एनडीए (NDA) मध्ये सध्या जागा वाटपावरून खूप गोंधळ चालू आहे. भाजप (BJP), जेडीयू (JDU), लोजपा (LJP), आरएलएम (RLM) आणि हम (HAM) यांच्यात अजूनही जागा वाटप ठरलेलं नाही. लोकशक्ती जनता पार्टी चे प्रमुख व केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी 40 पेक्षा जास्त जागा मागितल्या आहेत. पण भाजप त्या संख्येपर्यंत जायला तयार नसल्याचे समजते. भाजपने त्यांना 25 जागा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पण चिराग पासवान एवढ्या जागा घेण्यास नकार देत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने चिराग पासवान यांना 5 जागा सोडल्या होत्या. या पाचही जागा निवडून आणत चिराग पासवान यांनी लोकसभेत 100% स्ट्राईक रेट ठेवला.

2020 च्या बिहार विधानसभेत चिराग पासवान स्वतंत्र लढले होते. पण त्यांना फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले होते. पण लोकसभेनंतर आता पासवान विधानसभेतही जास्त जागा मागत आहे. तसेच मनासारख्या जागा न मिळाल्यास ते मागच्या वेळी सारखे स्वतंत्र लढू शकतात. तसेच प्रशांत किशोर (Prasahnt Kishor) यांच्या जण सुराज यांच्या पक्षासोबतही ते निवडणूक लढू शकतात.

राष्ट्रीय लोक मोर्चा ने सुमारे 25 जागांची मागणी केली :

उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा ने सुमारे 25 जागांची मागणी केली आहे. तर हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे प्रमुख तर केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manzi) यांनी 15 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. तर भाजपने त्यांना 7 जागांचा प्रस्ताव दिला आहे. जीतन राम मांझी यांनी सांगितलं की, त्यांना 15 जागा मिळाल्या नाहीत तर ते आघाडीतून बाहेर पडतील. त्यामुळे एनडीएमध्ये वातावरण तापलं आहे.

जीतन राम मांझी याना त्यांच्या पक्षाला मान्यता मिळवून द्यायची असल्याने कसल्याही परिस्थितीत 15 जागा नांदणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मागच्या विधानसभेत त्यांना 7 जागा मिळाल्या होत्या तर 4 जागा निवडून आल्या होत्या. जीतन राम मांझी बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत.

नितीश कुमारांची १०३ जागांची मागणी :

तर दुसरीकडे नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल ने यावेळी 103 जागांची मागणी केली आहे. मागच्या निवडणुकीत जनता दलाने 115 जागा लढून 43 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 110 जागा लढून 74 जागा जिंकल्या होत्या. पण जास्त जागा जिंकूनही भाजपने नितीश कुमार याना मुख्यमंत्री बनवले होते. यावेळीही आपण नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवत असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. मात्र, यावेळी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शहा (Amit Shah), योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे जोरदार प्रचार करत आहेत.

सध्या पटना आणि आसपासच्या भागात नेत्यांची बैठका सुरू आहेत. कुणी कुणाशी गुप्तपणे भेटतंय, तर काही नेते थेट पत्रकार परिषदेतून आपली मागणी मांडतायत. महिनाभरावर निवडणुक आली असताना NDA आघाडीत अजूनही जागा वाटप पूर्ण झाले नसून जागावाटपात पेच अजूनच वाढत आहे.

उमेदवारांची यादी घोषित झालेली नाही :

पुढील दोन-तीन दिवस जागावाटपात अत्यंत महत्वाचे असणार आहेत. त्यामुळे जागावाटपात या पेचात बिहार मध्ये हे सर्व पक्ष NDA सोबत निवडणूक लढणार की NDA मधून बाहेर पडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जागावाटपात स्वतः जातीने लक्ष देत आहेत.

तर दुसरीकडे विरोधी महागठबंधनातही आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये बोलणी सुरू आहेत. काही जागांवरून वाद आहेत, त्यामुळे अजून उमेदवारांची यादी घोषित झालेली नाही. सगळे पक्ष जातीय आणि प्रादेशिक समीकरणं पाहून आपापली रणनीती आखत आहेत.

News Title :- Big News: In Bihar, BJP Allies Ready to Break Away Over Seat Sharing; Will a Rift Emerge in the NDA?

 

Join WhatsApp Group

Join Now