निवडणुकीआधी इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा!

On: October 17, 2024 6:13 PM
Imtiaz Jaleel
---Advertisement---

Imtiaz Jaleel | केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याआधी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मोठी घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढणार आहेत.

Imtiaz Jaleel यांची मोठी घोषणा

लोकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी कशी मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहिती आहे, असं सांगत त्यांनी लोकसभा पोट निवडणूक आणि विधानसभा लढणार असल्याची घोषणा केलीये.

एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. बी टीम आम्हाला म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आता आम्ही या आरोपांना काडीचंही महत्त्व देत नाहीत, असंही जलली यांनी म्हटलंय.

दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या पारंपरिक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणानं बाजी मारली. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी चांगली आघाडी घेत विजय मिळवला. संदिपान भुमरे यांनी खैरे आणि इम्तियाज जलील यांचा पराभव केला.

लोकसभेच्या पराभवानंतर इम्तियाज जलील पुन्हा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. इम्तियाज जलील संभाजीनगरमधून विधानसभ लढणार आहेत. तर नांदेडची नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत देखील ते त्यांचं नशिब आजमवणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

रेल्वेचा मोठा निर्णय! फक्त ‘इतके’ दिवस आधी रेल्वेचं तिकीट बूक करता येणार

पाठदुखीचा त्रास होतोय? तर वेळीच सावध व्हा… अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

मोठी बातमी! भाजपच्या 5 विद्यमान आमदारांना मोठा धक्का?

बजाज कंपनी दमदार बाईक लाँच करणार; जाणून घ्या फीचर्स व किंमत

सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगनी दिली ‘इतक्या’ लाखांची सुपारी!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now