सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी; भत्ता वाढीची आकडेवारी जाहीर

On: June 16, 2025 7:13 PM
Minimum Balance Rule
---Advertisement---

7th Pay Commission | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शेवटच्या महागाई भत्ता (DA) वाढीची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, आता पुन्हा एकदा संपूर्ण देशभर महागाई भत्ता वाढीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते – पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून त्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो.

भत्ता वाढीची आकडेवारी जाहीर

जानेवारी महिन्यापासून वाढवल्या जाणाऱ्या महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय साधारणतः मार्च महिन्यात निघतो, तर जुलै महिन्यापासून वाढवल्या जाणाऱ्या महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय दिवाळीच्या आसपास जाहीर केला जात असतो. २०२५ बाबत बोलायचं झालं तर, जानेवारी २०२५ पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २% ने वाढवण्यात आला आहे. या वाढीमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३% वरून ५५% इतका झाला आहे. आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार, यासंदर्भात नवीन आकडेवारी हाती आली आहे.

काय सांगते नवीन आकडेवारी?

जुलै २०२५ पासून मिळणारी महागाई भत्ता वाढ ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ राहणार आहे. याचे कारण असे की, प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो. सध्याचा सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू झाला आहे, त्यामुळे आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. याच कारणामुळे, जुलै २०२५ पासूनची महागाई भत्ता वाढ ही सध्याच्या वेतन आयोगाची शेवटची महागाई भत्ता वाढ राहणार आहे.

दरम्यान, अखिल भारतीय ग्राहक निर्देशांकाच्या (All India Consumer Price Index) आधारे महागाई भत्ता वाढ ठरवली जात असते. जानेवारी ते जून २०२५ या कालावधीमधील अखिल भारतीय ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर जुलै २०२५ ची महागाई भत्ता वाढ ठरणार आहे.

अखिल भारतीय ग्राहक निर्देशांकाची जानेवारी ते एप्रिल या कालावधीमधील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५% इतका आहे; दरम्यान, ही वाढ लागू झाल्यानंतर महागाई भत्ता ५८% वर जाणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक वेतन येईल.

News Title- Important News for Government Employees

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now